Bacchu Kadu Sakal
महाराष्ट्र बातम्या

Bacchu Kadu Accident : बच्चू कडूंचा अपघात की घातपात? मिटकरींच्या मुद्द्यानं उपस्थित झाले अनेक प्रश्न

अपघातात बच्चू कडू यांच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Bacchu Kadu Accident : प्रहार जनजक्तीचे सर्वेसर्वा आणि शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांच्या अपघातानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

हे ही वाचा : गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

अपघातात बच्चू कडू यांच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली असून, त्यांच्यावर नागपूर येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

सध्या कडू यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, बच्चू कडू यांचा घात की, अपघात असा प्रश्न आता अनेकांकडून उपस्थित केला जात आहे.

या सर्व घडामोडींमध्ये राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्याकडून मोठा संशय व्यक्त करण्यात आला आहे. बच्चू कडूंचा अपघात झाला की, सत्ताधाऱ्यांनी घडवून आणलेला घातपात आहे? असा सवाल मिटकरी यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे.

तसेच मिटकरींनी या घटनेच्या चौकशीचीदेखील मागणी केली आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कडूंनी काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत भाष्य केले होते.

त्याच्या काही दिवसांनंतरच बच्चू कडू यांचा अपघात झाला आहे. त्यामुळे कडू यांचा अपघात की घात असा प्रश्न मिटकरींनी उपस्थित केला आहे.

यावेळी मिटकरींनी शिंदे-फडणवीस सरकारवर भाष्य केले. ते म्हणाले की, ज्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल, त्या दिवशी हे सरकार कोसळेल, असे भाकीतही त्यांनी व्यक्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT