Bacchu Kadu Reaction on Hindustani Bhau 
महाराष्ट्र बातम्या

शिक्षणाशी संबंध नसलेल्या लोकांचा आंदोलनात सहभाग - बच्चू कडू

'हिंदुस्तानी भाऊ'च्या सांगण्यावरुन हे विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचं समजतंय.

सुधीर काकडे

दहावी बारावीच्या परीक्षा ऑनलाईन (10th And 12th Exams) घ्याव्यात अशी मागणी घेऊन राज्यातील अनेक ठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. पुणे, नागपुर, औरंगाबाद, अकोला आणि मुंबईतील काही ठिकाणी विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. त्यानंतर राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सरकारची बाजू मांडली आहे. हिंदुस्तानी भाऊ (Hindustani Bhau) म्हणून कुणीतरी आंदोलनाची सुरूवात केली होती. त्यांची मागणी आम्ही जाणून घेऊ, मात्र कुणीही अशी मागणी करायची गरज नाही, शिक्षण विभाग त्यासाठी तत्पर आहे असं बच्चू कडू म्हणाले आहेत. (Bacchu Kadu Reaction on Hindustani Bhau)

राज्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर बोलताना बच्चू कडू म्हणाले, काही विद्यार्थी रस्त्यावर आले म्हणजे, सर्व विद्यार्थ्यांचं असंच मत आहे असं म्हणता येणार नाही. ज्यांचा शिक्षणाशी संबंध नाही, त्या लोकांचाही या आंदोलनात सहभाग असल्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांची मागणी काय आहे? आंदोलनाचं आयोजन कुणी केलं? याची चौकशी केली जाईल. विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही यासाठी आम्ही योग्य निर्णय घेऊ असंही बच्चू कडूंनी स्पष्ट केलं आहे. पोलिसांनी देखील आंदोलन अतिशय व्यवस्थित हाताळावं असही त्यांनी यावेळी सांगितलं आहे. (Bacchu Kadu News)

हिंदुस्थानी भाऊनं व्हिडिओमध्ये काय म्हटलं? (Hindustani Bhau Viral Video)

दोन वर्षात कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांचे देखील मृत्यू झाले आहेत. या धक्क्यातून कुटुंब अजून सावरलेलं नाही. आता ओमिक्रॉन आला आहे. स्वतः सरकार म्हणतेय की घरात राहा, काळजी घ्या. मग सरकार विद्यार्थ्यांचा बळी का देत आहे? प्रोफेसर ऑनलाइन बैठक घेत आहेत. तुम्हाला तुमच्या जीवाची काळजी आहे, तर विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ का? असा सवाल हिंदुस्थानी भाऊनं त्याच्या व्हिडिओमधून केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

Dhule Crime : दारूच्या नशेत पत्नीवर प्राणघातक हल्ला, धुळे कोर्टाने सुनावली ५ वर्षांची शिक्षा

SCROLL FOR NEXT