Bacchu Kadu News esakal
महाराष्ट्र बातम्या

Bacchu Kadu: बच्चू कडू मंत्रिपदाच्या शर्यतीतून बाहेर, पण...; सरकारमध्ये राहण्याबाबतही स्पष्ट केली भूमिका

सरकारमध्ये रहायचं की नाही याबाबतही त्यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

अमरावती : मंत्रिपदावरुन अस्वस्थ असलेले अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी सकाळी ११ वाजता आपल्या कार्यकर्त्यांशी बोलून सरकारमध्ये रहायचं की नाही, हे स्पष्ट करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार, आता त्यांचा निर्णय झाला असून आपण मंत्रिपदाच्या शर्यतीतून बाहेर पडत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच सरकारमध्ये रहायचं की नाही याबाबतही त्यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं आहे. (Bacchu Kadu out of ministerial race He also explained his stance on staying in govt)

कडू म्हणाले, खरंतर गेले पाच वर्षे तुम्ही मला या सरकारमध्ये पाहत आहात. यासाठी मी उद्धव ठाकरेंचे आभार मानेन. आम्हा दोन अपक्ष आमदारांना त्यांनी पाठिंब्यासाठी विनंती केली होती. त्यामुळं आम्ही त्यांना पाठिंबा दिला आणि मला शब्द दिल्याप्रमाणं त्यांनी राज्यमंत्रीपदही दिलं.

शिंदेंचा गुलाम म्हणून काम करेन

त्यानंतर जे काही नवीन समीकरणं जुळायला लागले तेव्हा आम्ही उद्धव ठाकरेंना दिव्यांग मंत्रालय स्थापण्याबाबत मागणी केली होती. पण ते काही झालं नाही जर ते झालं असतं तर आम्हाला गुवाहाटीला जायची गरज पडली नसती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मला दिव्यांग मंत्रालय दिलं. देशात पहिल्यांदाच असं मंत्रालय तयार झालं. ही माझ्यासाठी आयुष्यातली सर्वात मोठी घटना आहे. माझ्या गुवाहाटीला जाण्यामुळं हे दिव्यांग मंत्रालय मिळालं आहे. या भेटीसाठी मी त्यांचा गुलाम म्हणून काम करेन त्यांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत.

१८ जुलैला अंतिम निर्णय जाहीर करणार

सत्ता पैसा आणि पुन्हा सत्ता या बदलत्या राजकारणाचा आम्हाला कंटाळा आला आहे. लोकांची यामागे पाहण्याची भूमिका विचित्र आहे. याला स्थिरता यायला पाहिजे. लोक आमच्यावर आरोप आणि चारित्र्य हनन करत आहेत. यापुढं आम्ही दिव्यांगांसाठी शहीदांसाठी, शेतकऱ्यांसाठी काम करणार आहोत. त्यामुळं मंत्रीपदाचा दावा आम्ही सोडणार असल्याचा निर्णय घेणार होतो. पण आता मुख्यमंत्र्यांनी विनंती केली की, तू आज हा निर्णय घेऊ नकोस मी भेटल्यानंतर याबाबत निर्णय घे. त्यामुळं १७ जुलै रोजी आमची भेट होईल, त्यानंतर १८ जुलै रोजी मी माझा निर्णय जाहीर करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ashok Saraf : कार्यक्रम अशोक सराफ यांच्या पुरस्काराचा, चर्चा मुश्रीफ, बंटी पाटील, उदय सामंत यांच्या राजकीय टोलेबाजीची, मामाही म्हणाले...

Nirav Modi: प्रत्यार्पण खटला पुन्हा सुरू करा; नीरव मोदीस मानसिक आणि शारीरिक छळाची भीती

प्रेमसंबंधाचा संशय! लेकीला हात बांधून कालव्यात ढकललं, बापाने व्हिडीओसुद्धा शूट केला; आई अन् लहान भाऊ बघत राहिले

Hot Chocolate For Periods: पीरियड्समध्ये हॉट चॉकलेट का प्यावं? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Mumbai News: मुंबईकरांचा त्रास कमी होणार! पाऊस थांबताच काँक्रीटीकरणाला सुरुवात; पालिकेची खड्डेमुक्त शहराकडे वाटचाल

SCROLL FOR NEXT