Satyajeet Tambe Balasaheb Thorat esakal
महाराष्ट्र बातम्या

Congress : बंडखोर नेते सत्यजित तांबे काँग्रेसमध्ये परतणार? बाळासाहेब थोरातांचं सूचक वक्तव्य

नाशिक पदवीधर निवडणुकीत काँग्रेसचे बंडखोर नेते आणि अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी विजय संपादन केला होता.

सकाळ डिजिटल टीम

काही महिन्यांपूर्वी नाशिक पदवीधर निवडणुकीत (Nashik Graduate Election) काँग्रेसचे बंडखोर नेते आणि अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी विजय संपादन केला. त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव केला होता.

आता माजी मंत्री आणि आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी सत्यजित तांबेंच्या (Satyajeet Tambe) काँग्रेस प्रवेशाबाबत (Congress) महत्वाचं विधान केलंय.

एखाद्या मंदिरात भेट झाल्यास भाजप (BJP) नेत्यांसमवेत फोटो काढला असेल, तर गैर नाही. सत्यजित हा अपक्ष आहे, अपक्षाला कोणताही पक्ष नसतो, त्यानं यापूर्वीही तसं ट्विट केलंय. मात्र, तो काँग्रेसमध्ये वाढलाय, त्याच्यामध्ये काँग्रेसचे विचार रुजले आहेत, त्यामुळं काँग्रेस प्रवेशासंदर्भातचा तो त्याचा निर्णय घेईल, असं सूचक विधान बाळासाहेब थोरात यांनी केलंय.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार सत्यजित तांबे यांचा फोटो सोशल माध्यमांवर फिरत असतानाच आमदार थोरात यांनी यावर भाष्य केलंय. थोरातांच्या वक्तव्याला सत्यजित तांबे प्रतिसाद देतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 15 मिळतोय फक्त 35 हजारात; खरेदीसाठी उडाली झुंबड, कशी काय सुरुय ही धमाकेदार ऑफर? पाहा कुठे बूक करायचा

MI vs RCB: विराट कोहलीवर BCCI करणार कारवाई? रागाच्या भरात केले 'ते' कृत्य... मग फिल्डिंगला पण आला नाही

Dr. Ambedkar Birthplace Ambadwe : बाकी सगळं ठीक, पण विकास कुठेय? डॉ. आंबेडकरांच्या मूळ गावातील रखडलेली कामे पाहून तुमचाही होईल हिरमोड; पाहा वास्तव

हनीमूनच्या रात्री वधूच्या धक्कादायक अटी, संबंध ठेवण्यासाठी ९० लाखांची मागणी; पैसे न दिल्यानं केलं भयंकर कांड

EPF Rule: नोकरी बदलली तर 5 वर्षांचा PF नियम तुटतो का? NCP Days म्हणजे काय? पेन्शन-टॅक्सवर काय परिणाम

SCROLL FOR NEXT