Eknath Khadse Latest News esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Khadse: बाळासाहेबांची शिवसेना अन् RSS; खडसेंनी असा जोडला संबंध

एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव निवडणूक आयोगानं दिलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुक्ताईनगर : शिवसेनेच्या फुटीनंतर एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नव नाव निवडणूक आयोगाकडून देण्यात आलं आहे. आयोगाच्या या निर्णयाचे राज्यभर पडसाद उमटले आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी देखील भाष्य केलंय. त्यांनी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचं नाव आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबतचा एक योगायोग सांगितला आहे. (Balasahebanchi Shiv Sena and Balasahebanchi RSS coincidence told by Eknath Khadse)

खडसे म्हणाले, निवडणूक आयोगानं धनुष्यबाण चिन्ह बाद केल्यानंतर उद्धव यांच्या पक्षाला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असं नामकरण करत मशाल चिन्ह दिलं. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिलं पण अद्याप चिन्ह दिलेलं नाही. या दोन्ही पक्षांच्या माध्यमातून आणि नवीन चिन्हांमुळं येणारी अंधेरीची पोटनिवडणूक अगदी चुरशीचं होईल.

बाळासाहेबांची शिवसेना आणि आरएसएस

बाळासाहेब देवरस यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली होती. पण आता हा योगायोग आहे की बाळासाहेब देवरस यांच्या नावाशी मिळतं जुळतं 'बाळासाहेबांची शिवसेना' असं नाव शिंदे गटाला मिळालं आहे. यामधून कोणाला कसा अर्थ काढायचा तो त्यांनी काढावा, असंही खडसे यांनी म्हटलं आहे.

नव्या चिन्हामुळं कोणत्या गटाची होणार अडचण

वर्षानुवर्षे शिवसेनेनं धनुष्यबाण म्हणून निवडणुका लढवल्या. तळागळात, ग्रामीण भागात या चिन्हाची ओळख होती. पण आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं 'मशाल' हे चिन्ह पुढं आलेलं आहे. अशा प्रकारे जेव्हा कोणतंही नवं चिन्ह येतं तेव्हा ते चिन्ह रुजवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. पण गावपातळीवर ज्याचं संघटन आहे, त्याला चिन्हाचा प्रसार करण्याची गरज पडत नाही, त्याला ते सोईच असतं. शिवसेनेचं संघटन हे गावपातळीवर गेलेलं आहे. त्यामुळं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला फरशी अडचण येणार नाही. शिंदे सेना ही नवीन सेना असून त्यांचेही आमदार ग्रामीण भागापर्यंत आहेत. त्यामुळं त्यांनाही फारशी मेहनत घ्यावी, लागेल असं मला वाटत नाही, असंही यावेळी एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : एकनाथ शिंदेची शिवसेना कोल्हापुरात स्वबळावर लढणार का? कार्यकर्त्या बैठकीत काय झाला निर्णय

Women's World Cup : हर्लीन देओलचा प्रश्न अन् लाजले पंतप्रधान नरेंद्र मोदी; वर्ल्ड कप विजेत्या पोरींना आवरेना हसू Video Viral

Suraj Wife: ही आहे सुरज चव्हाणची होणारी बायको! अंकिताने खास पद्धतीने दोघांचं केलं केळवण, सुरजचा उखाणा एकदा ऐका! Viral Video

Vayuputhra : हे आहे 'वायुपुत्र'! भारताचं पहिलं इलेक्ट्रिक रॉकेट; कितीहीवेळा करा चार्जिंग, लवकरच स्पेसमध्ये जाणारा हा चमत्कार एकदा बघाच

Pune Car Accident : पुण्यात आणखी एक भीषण अपघात ! पौड रस्त्यावर मेट्रो पिलरला कार धडकली अन्...

SCROLL FOR NEXT