Sambhajiraje esakal
महाराष्ट्र बातम्या

Political News : कोश्यारींनी महाराष्ट्रात राहावं असं कोणाला वाटत होतं? संभाजीराजेंचा घणाघात

भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी मंजूर केला आहे. रमेश बैस हे महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल असणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

केंद्र सरकारनं (Modi Government) भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यास दीड महिन्याचा कालावधी का लावला?

Sambhajiraje News : वादग्रस्त वक्तव्यांमुळं स्वत:ला आणि सरकारला सातत्यानं अडचणीत आणणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर झालाय. काही दिवसांपूर्वी भगतसिंह कोश्यारींनी पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्याकडं आपल्याला राज्यपाल पदावरुन पायउतार व्हायचं आहे, अशी इच्छा व्यक्त केली होती.

गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्यं केल्यामुळं कोश्यारी अडचणीत आले होते. त्यामुळं विरोधकांनी राज्यपाल कोश्यारींच्या (Bhagat Singh Koshyari) राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. यानंतर भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा देण्याचे संकेत दिले होते, त्यानुसार आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केला आहे.

कोश्यारींना महाराष्टातून बाहेर काढण्याची मागणी

याचदरम्यान आता माजी खासदार व स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराजे (Sambhajiraje) यांनी केंद्र सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, असा टोला लगावला. संभाजीराजे माध्यमांशी बोलत होते. संपूर्ण महाराष्ट्रानं जेव्हा सांगितलं की, तुम्ही चुकताय. वादग्रस्त विधानं करत नेहमी करत असतात. महापुरुषांचा अवमान करत असतात. महाराष्ट्रात राज्यपालांच्या वादग्रस्त विधानांवरुन किती गदारोळ झाला आहे. ग्रामीण भागातल्या शेवटच्या घटकांनी, तळागळातल्या लोकांनी सुध्दा कोश्यारी यांना महाराष्टातून बाहेर काढा अशी मागणी करण्यात आली. पण तेव्हा का निर्णय घेतला नाही.? असा सवाल त्यांनी केला.

'कोश्यारींनी महाराष्ट्राची संस्कृतीची घडी मोडून काढली'

केंद्र सरकारनं (Modi Government) भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यास दीड महिन्याचा कालावधी का लावला? असा सवाल करत कोश्यारींनी महाराष्ट्रात राहावं असं कोणत्या व्यक्तीला वाटत होतं, अशी घणाघाती टीकाही संभाजीराजेंनी केली. राज्यपालांना कुणी पाठीशी घातलं हे सर्वांना माहिती आहे. पण, जुन्या बाबींवर चर्चा करण्यात काही अर्थ नसून नवीन राज्यपालांकडून आपण अपेक्षा बाळगायला हव्यात. नवीन राज्यपालांनी जुन्या राज्यपालांनी काय चुका केल्या त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी अभ्यास करायला हवा. महाराष्ट्राची संस्कृतीची घडी मोडून काढली. राज्यपाल हा कोणत्या पक्षाचा नसतो. त्यांनी पक्ष, जातीपातीपलीकडं जाऊन वागायला हवं, असंही संभाजीराजे म्हणाले. कोश्यारींनंतर आता रमेश बैस हे महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT