Bhavini Patil daughter of Gujarat BJP state president CR Patil won esakal
महाराष्ट्र बातम्या

धक्कादायक निकाल; भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी 'गुजरात'ला मिळवून दिलं यश, पण मुलीचं पॅनल झालं पराभूत

निकालांत गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांच्या कन्या भाविनी पाटील मोहाडी ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून विजयी झाल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

निकालांत गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांच्या कन्या भाविनी पाटील मोहाडी ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून विजयी झाल्या आहेत.

जळगाव : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे (Gram Panchayat Election) निकाल काय लागणार, याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय. सर्वच ग्रामपंचायतींमध्ये मतमोजणीला (Vote Counting) सुरुवात झालीये.

या निकालांत गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील (Gujarat BJP State President CR Patil) यांच्या कन्या भाविनी पाटील (Bhavini Patil) जामनेर तालुक्यातील मोहाडी ग्रामपंचायत सदस्यपदी विजयी झाल्या. मात्र, त्यांचं ग्राम विकास पॅनल पराभूत झालंय.

भाविनी पाटील यांच्या ग्रामविकास पॅनलला 10 पैकी 3 जागा मिळाल्या आहेत. भाविनी पाटील यांचे प्रतिस्पर्धी शरद पाटील यांच्या लोकशाही उन्नती पॅनलला दहा पैकी सात जागा मिळाल्या, त्यात लोकनियुक्त सरपंचपदही शरद पाटलांच्या पॅनलला मिळालं आहे.

मोहाडी ग्रामपंचायतच्या निकालाकडं जळगाव जिल्हासह राज्याचं लक्ष लागून होतं. या ठिकाणी भाजप विरुद्ध भाजप अशी लढत होती. भाविनी पाटील यांच्या पॅनलला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा होता. परंतु, निकालात त्यांच्या पॅनलला पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळं हा धक्कादायक निकाल मानला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain News : पुढील पाच दिवस धोक्याचे, गरज असेल तरच घराबाहेर पडा; हवामान विभागाचा इशारा

Panchang 17 August 2025: आजच्या दिवशी श्री सूर्याय नमः मंत्राचा 108 जप करावा

न्यायपालिका सर्वोच्च नाही, राष्ट्रपती अन् राज्यपालांच्या अधिकारांवर केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाला स्पष्टच सांगितलं

Pune Rains : पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार

Shubhanshu Shukla : शुभांशू शुक्ला मायदेशी परतले; दिल्ली विमानतळावर ढोल-ताशांच्या गजरात जोरदार स्वागत, पंतप्रधान मोदींची घेणार भेट

SCROLL FOR NEXT