solapur sakal
तात्या लांडगे
सोलापूर : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) ७ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी तरुण-तरुणींसह शिक्षकांनी देखील अर्ज केले आहेत. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या शिक्षकांना इलेक्शन ड्युटीतून सवलत दिली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील परीक्षेला बसलेल्या शिक्षकांची तालुकानिहाय माहिती मागविली आहे. परीक्षेसाठी अर्ज केले आहेत, पण ज्यांना इलेक्शन ड्युटी आली असे सोलापूर जिल्ह्यात अंदाजे अडीच हजार शिक्षक आहेत.
सोलापूर जिल्हा परिषदेसह राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान होणार होते, त्यामुळे इलेक्शन ड्युटी करुन शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षेला जाता येणार होते. पण, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर राज्यात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी (ता. २९) वेळापत्रकात बदल केला आणि मतदानाची तारीख ५ ऐवजी ७ फेब्रुवारी केली. त्यामुळे इलेक्शन ड्युटी आलेल्या शिक्षकांची पंचाईत झाली होती. यासंदर्भात ३० जानेवारीच्या अंकात केंद्राची ‘सीटीईटी’ अन् मतदान एकाच दिवशी’ या मथळ्याखाली ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशीत केले होते. याची दखल घेऊन निवडणुकीच्या कामातून परीक्षेला बसलेल्या शिक्षकांना सूट मिळणार आहे.
तालुकानिहाय माहिती मागविली, मग निर्णय
मतदान आणि शिक्षक पात्रता परीक्षा एकाच दिवशी आल्याने इलेक्शन ड्युटी आलेल्या काही शिक्षकांची अडचण झाली आहे. त्यांच्या बाबतीत एक-दोन दिवसांत सकारात्मक निर्णय घेतला जाणार आहे. इलेक्शन ड्युटी आलेल्यांपैकी किती शिक्षकांनी ‘सीटीईटी’साठी अर्ज केले आहेत, याची माहिती तालुकानिहाय मागविली आहे.
- संतोषकुमार देशमुख, उपजिल्हाधिकारी, सोलापूर
शिक्षकांची संधी हुकायला नको...
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांवरील शिक्षकांना (ज्यांचे वय ५३ वर्षांपर्यंत आहे असे सगळेच) दोन वर्षांत शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण व्हावीच लागणार आहे. न्यायालयाने दिलेली मुदत ३१ ऑगस्ट २०२७ रोजी संपणार आहे. या काळात शिक्षकांना परीक्षेच्या साधारणत: आणखी चार संधी मिळणार आहेत. त्यातील एक संधी हुकली तर त्यांना भविष्यात अडचणी येतील म्हणून जिल्हा प्रशासनाने इलेक्शन ड्युटीतून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.