mantralay sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ८००० शिक्षकांची भरती; आधी होणार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन, शिक्षकांच्या बदल्या आता जूनपूर्वी होणार

राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सद्य:स्थितीत १५ हजार १५८ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जिल्हा परिषद शाळांमधील ८० टक्क्यांप्रमाणे सुमारे आठ हजार शिक्षकांच्या भरतीचे नियोजन केले आहे. महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांची आचारसंहिता संपल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होईल आणि त्यानंतर फेब्रुवारी-मार्चपासून शिक्षक भरतीस सुरवात होणार आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सद्य:स्थितीत १५ हजार १५८ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जिल्हा परिषद शाळांमधील ८० टक्क्यांप्रमाणे सुमारे आठ हजार शिक्षकांच्या भरतीचे नियोजन केले आहे. महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांची आचारसंहिता संपल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होईल आणि त्यानंतर फेब्रुवारी-मार्चपासून शिक्षक भरतीस सुरवात होणार आहे.

सध्या २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाची संचमान्यता अंतिम टप्प्यात आहे. त्यानंतर १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार पटसंख्येअभावी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन होईल. दरम्यान, नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आमदार विजय वड्डेटीवार, भास्कर जाधव, नाना पटोले, बळवंत वानखेडे यांच्यासह अन्य आमदारांनी जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केला होता. त्यासाठी त्यांनी शिक्षकांच्या रिक्त पदांवर बोट ठेवत शिक्षक भरतीची मागणी केली.

या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांची रिक्त पदे भरण्याचे नियोजन केले असून जिल्हानिहाय रिक्त पदांची यादी संकलित केली आहे. आता ‘टीईटी’ परीक्षेचा निकाल देखील लागला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता संपल्यावर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करून रिक्त राहिलेल्या जागांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर मागवून घेतल्या जातील. त्यानंतर संपूर्ण भरती प्रक्रिया ‘पवित्र’ पोर्टलवरून राबविली जाईल, असे शिक्षण संचालक कार्यालयातील विश्वसनिय सूत्रांनी सांगितले.

जिल्हा परिषद शाळांची स्थिती

  • एकूण शाळा

  • ६३,०००

  • एकूण शिक्षक

  • १.९८ लाख

  • रिक्त पदे

  • १५,१५८

  • रिक्त भरतीचे नियोजन

  • ८,०००

शिक्षकांच्या बदल्या आता जूनपूर्वी

जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या ग्रामविकास विभागामार्फत दरवर्षी केल्या जातात. दरवर्षी साधारणत: ६५ ते ७० हजार शिक्षकांच्या बदल्या होतात. पण, सध्या बदली प्रक्रिया जून ते ऑक्टोबरपर्यंत चालते. त्यामुळे शिक्षकांना अर्ध्यातूनच शाळा सोडून दुसऱ्या शाळांमध्ये जावे लागते. अशावेळी त्या शाळेच्या गुणवत्तेवर, विद्यार्थ्यांच्या मानसिकेतवर परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर आता शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदलीची प्रक्रिया एप्रिल ते जून या तीन महिन्यांत राबविली जाणार आहे.

एकूण रिक्त पदांपैकी ८० टक्के पदभरती

सोलापूर जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७७५ शाळांमध्ये ४०२ पदे रिक्त आहेत, पण त्यात पदवीधर शिक्षकांसह मुख्याध्यापकांची देखील पदे आहेत. शासन निर्णयानुसार एकूण रिक्त पदांपैकी ८० टक्के पदे भरली जातात. २०२५-२६ च्या संचमान्यतेनुसार पहिल्यांदा अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन होईल. त्यानंतर रिक्त पदांच्या भरतीची मागणी केली जाईल.

- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mhaisal Panchayat Samiti : प्रचार अंतिम टप्प्यात असतानाच धक्का! भाजप उमेदवाराच्या पतीचे हृदयविकाराने निधन; म्हैसाळ पंचायत समिती गणात शोककळा

Supriya Sule: संसदेत चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणाची! विविध पक्षांच्या नेत्यांनी खासदार सुप्रिया सुळेंची भेट घेऊन केले सांत्वन

Union Budget 2026 : मुंबईत ग्रोथ हबसाठी ५ हजार कोटी, तर मेट्रोसाठी १७०२ कोटी

MLA Rohit Pawar: तेरा दिवस राजकारण नाही: आमदार रोहित पवार, बोडके परिवाराची भेट घेत केले सांत्वन!

‘द केरळ स्टोरी 2: गोज़ बियॉन्ड’मधील प्रमुख महिला कलाकारांचे कॅरेक्टर पोस्टर्स प्रदर्शित

SCROLL FOR NEXT