Maharashtra Politics Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: महाविकास आघाडीसमोर पेच! महापालिका निवडणुकीपूर्वी पक्षांतराच्या हालचालींना वेग

प्रश्न अनेक; तरी ठाकरे सेनेचे पदाधिकारी गप्पच

सकाळ डिजिटल टीम

राज्यातील सत्तासंघर्ष आणि आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी होणार की सर्व पक्ष स्वतंत्रपणे लढणार, यावर सोलापूर महापालिकेच्या अनेक माजी नगरसेवकांचे लक्ष आहे. महाविकास आघाडी झाल्यास त्यांना बंडखोरीचा फटका बसू शकतो. स्वतंत्रपणे लढल्यास तिन्ही पक्षाला सर्व जागांवर तगडे उमेदवार मिळतील का, असा दुहेरी पेच सध्या निर्माण झाला आहे.(Latest Marathi News)

महापालिका निवडणुकीपूर्वी अनेक माजी नगरसेवक, विविध पक्षांचे पदाधिकारी पक्षांतर करतील, अशी स्थिती आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष महाविकास आघाडी आणि भाजप-शिंदे सेनेच्या युतीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारीची शाश्‍वती पाहून अनेकजण पक्षांतराचा निर्णय घेतील, अशी चर्चा आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, शिवसेनेचे माजी नगरसेवक राजकुमार हंचाटे, सुनील खटके, किरण पवार, काँग्रेसच्या माजी महापौर नलिनी चंदेले, ॲड. यु. एन. बेरिया, भाजपचे माजी शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, बिज्जू प्रधाने काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक दिलीप कोल्हे, एमआयएमचे शहराध्यक्ष तौफिक शेख यांच्यासह काही नगरसेवकांनी पक्षांतर केले आहे.

आगामी निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीतील अनेकजण भाजप-शिंदे सेनेत येतील, असा दावा केला आहे. तर भाजप व शिंदे सेनेतील काहीजण आमच्या पक्षात येतील, असा दावा राष्ट्रवादी व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. पण, कोण कोणत्या पक्षात असणार? हे लवकरच स्पष्ट होईल.(Latest Marathi News)

प्रश्न अनेक; तरी ठाकरे सेनेचे पदाधिकारी गप्पच

शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना व उद्धव ठाकरे यांची शिवसेना, असे दोन गट तयार झाले. शिंदे सेनेने जिल्ह्यात विशेषत: सोलापूर शहरात पाय घट्ट रोवायला सुरवात केली आहे. त्यासाठी जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, मनीष काळजे, चरणराज चवरे, महेश चिवटे व शहरप्रमुख मनोज शेजवाल यांची धडपड सुरु आहे.(Latest Marathi News)

ठाकरे गटाचे शहरप्रमुख कोण, जिल्हाप्रमुख कोठे आहेत, अशा प्रश्नांचे उत्तर शिवसैनिकांना सापडलेले नाही. निवडणुका नसल्याने ठाकरे गटाचे बहुतेक पदाधिकारी लोकांमध्ये पाहायला मिळत नसल्याची स्थिती आहे.

राज्यातील बेरोजगारी अन्‌ मेगाभरतीची प्रतीक्षा, महागाई, दुधाचे घसरलेले दर, शेतकऱ्यांच्या वाढलेल्या आत्महत्या, कारखान्यांकडून शेतकऱ्यांना न मिळालेली एफआरपी, कांद्याचे घसरलेले दर, असे अनेक विषय असतानाही ठाकरे सेनेचे पदाधिकारी कोणतीच भूमिका घेत नसल्याचे चित्र आहे. मागील काही महिन्यांपासून संपर्कप्रमुख अनिल कोकीळ हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले नाहीत. त्यामुळे ठाकरे सेना कोठे आहे? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

‘हे’ नगरसेवक कोणत्या पक्षांचे?

माजी महापौर महेश कोठेंनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला आणि अनेकांची पंचाईत झाली. अमोल शिंदे यांनी शिंदे सेनेत जाण्याचा निर्णय घेतला आणि ते जिल्हाप्रमुख झाले. आता देवेंद्र कोठे, कुमुद अंकाराम यांच्यासह कोठे समर्थक नगरसेवक कोणत्या पक्षात राहणार, याची उत्सुकता आहे. वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रदेश प्रवक्ते सध्या कोणत्याच पक्षात नाही.

महाविकास आघाडीचे सरकार असताना माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून ते राष्ट्रवादीत जाण्याच्या बेतात होते, पण सत्तांतर झाले आणि चंदनशिवे, गणेश पुजारी यांचा प्रवेश रखडला. काँग्रेसच्या गोल्डन नगरसेविका श्रीदेवी फुलारे, भाजपचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील, काँग्रेसच्या नगरसेविका प्रिया माने हे पक्षापासून दुरावले आहेत. ते सध्या कोणत्या पक्षात आहेत, या प्रश्नाचे उत्तर अनेकांना सापडलेले नाही.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फसव्या जाहिराती, निकृष्ट दर्जा! सौंदर्यप्रसाधनांवर FDAची कारवाई; गैरप्रकार सहन केला जाणार नाही, तुकाराम मुंढेंचा इशारा

Sindhudurg Rain Update : सिंधुदुर्गकरांनो, आणखी वाट पाहावी लागणार! मॉन्सून पूर्णपणे मंदावला; पाहा पुढील 4 दिवसांचा अंदाज, शेतीची कामे रखडली

Fifa World Cup 2026 : जपानी फॅन्स मॅचनंतर स्टेडियममधील कचरा का उचलतात? त्या तरूणीनं 'Meiwaku' बद्दल सांगितलं, जाणून घ्या काय आहे ते?

Nagpur: पाण्याचे शिंतोडे उडाल्याच्या वादातून खून;कळमन्यातील घटना; दोन कुटुंबातील सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Satara Sangli Election: सातारा-सांगली निवडणुकीत मोठा सस्पेन्स! राष्ट्रवादीची नाराजी उघड, भाजपला मित्रपक्षांची साथ मिळणार का?

SCROLL FOR NEXT