Sharad Pawar vs Bharat Gogavle esakal
महाराष्ट्र बातम्या

शरद पवारांनी उद्धव ठाकरेंवर लिंबू फिरवलाय, असं का म्हणाले शिंदे गटाचे गोगावले

भाजपसोबत युती करून सत्ता चालवू असं सांगितलं असतं तर आम्ही पाच पावलं मागं आलो असतो; पण..

सकाळ डिजिटल टीम

भाजपसोबत युती करून सत्ता चालवू असं सांगितलं असतं तर आम्ही पाच पावलं मागं आलो असतो; पण..

रायगड : मागील महिन्यापासून रखडलेला शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा पहिला टप्पा नुकताच पार पडला. राजभवनातील दरबार हॉलमध्ये पहिल्या टप्प्यात 18 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यात भाजपाचे ९ आणि शिंदे गटाच्या ९ आमदारांना मंत्रिपदे देण्यात आली. याच पार्श्वभूमीवर भरत गोगावले यांचंही वक्तव्य समोर आलंय. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावरही निशाणा साधलाय.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर कुठं लिंबू फिरवला आणि कुठल्या भक्ताकडे गेले माहीत नाही, असं वक्तव्य शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले (Bharatshet Gogawale) यांनी केलंय. ते रायगड जिल्ह्यातील (Raigad District) गोरेगाव येथील कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. रायगड जिल्ह्यातील गोरेगाव इथं मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात बोलताना भरत गोगावले यांनी हे वक्तव्य केलंय. त्यातच मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ते नाराज असल्याचंही कळतंय.

भाजपासोबत (BJP) युती तुटल्यानंतर शिवसेनेनं राष्ट्रवादी काँगेस आणि काँग्रेससोबत युती करत राज्यात महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) स्थापन केलं होतं. या सरकारच्या काळात शिवसेनेच्या आमदारांना दुजाभाव मिळत असल्याची तक्रार अनेकदा गोगावलेंनी उद्धव ठाकरेंकडे केली होती. अखेर एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंडखोरी करत भाजपासोबत युती केली आणि राज्यात नवं सरकार स्थापन केलं. मात्र, “शिवसेनेनं भाजपासोबत युती केली असती तर पाच पावले मागे आलो असतो”, असं गोगावले म्हणाले.

भाजपसोबत युती करून सत्ता चालवू असं सांगितलं असतं तर आम्ही पाच पावलं मागे आलो असतो. पण, शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कुठं लिंबू फिरवला आणि कुठल्या भक्ताकडे गेले माहीत नाही, असं गोगावले यांनी म्हटलंय. दरम्यान, शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यानं भरत गोगावले नाराज असल्याचं बोललं जात आहे. परंतु, आपण नाराज नसल्याचं स्पष्टीकरणही गोगावले यांनी दिलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tilak Varma Injury: तिलक न्यूझीलंडविरुद्ध T20 सामन्यांतून बाहेर, वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Pune Election : शहरातील क्रीडा संकुल, शाळा-महाविद्यालयांत मतमोजणी केंद्रे तयार!

Maharashtra Police Foundation Day : "शहर सुरक्षेसाठी पोलिस, नागरिकांचा एकत्रित सहभाग महत्त्वाचा"- अमितेश कुमार!

Congress Manifesto: ‘पुणे फर्स्ट’चा नारा! पुण्यासाठी काँग्रेस काय करणार? जाहिरनाम्यात नेमकं काय?

Pune Traffic : "शहरात ‘कमी खर्चाचे’ वाहतूक व्यवस्थापन यशस्वी; कोंडी निम्म्याने कमी"- अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील!

SCROLL FOR NEXT