Naxalists vs Devendra Fadnavis esakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis : पोलिस भरतीला गेलेल्या तरुणांची हत्या; माओवादी, नक्षलवाद्यांना फडणवीसांचा थेट इशारा

गडचिरोलीच्या पोलीस फोर्समध्ये (Gadchiroli Police Force) नक्षलवादी मुले भरपूर प्रमाणात आहेत.

हेमंत पवार

माओवाद्यांचे एलिमिनेशन गेल्या काही वर्षात आपण केले आहे. त्यामुळे निश्चितपणे ते अशा घटना घडवण्याचा प्रयत्न करतात.

कराड : माओवादी किंवा नक्षलवाद्यांच्या (Naxalists) मुलाला पोलिस दलात भरती होण्यासाठी गेल्यावर त्यांची हत्या केली जात असेल तर सरकारकडून त्यांचे प्रयत्न हाणून पाडले जातील. त्यामुळे निश्चितपणे अशा घटना आटोक्यात आणण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.

कराड दौऱ्यावर आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, गडचिरोलीमध्ये पोलीस भरतीसाठी गेलेल्या तरुणाची हत्या केल्याच्या घटना नक्षलवाद्यांनी किंवा मौवाद्यांनी यापूर्वीही केल्या आहेत. असे प्रयत्न सरकार म्हणून आपण हाणून पाडले आहेत. जनतेनेही हाणून पाडले आहेत.

गडचिरोलीच्या पोलीस फोर्समध्ये (Gadchiroli Police Force) नक्षलवादी मुले भरपूर प्रमाणात आहेत. अजूनही भरती होण्याचा त्यांचा ओघ कायम आहे. माओवाद्यांचे एलिमिनेशन गेल्या काही वर्षात आपण केले आहे. त्यामुळे निश्चितपणे ते अशा घटना घडवण्याचा प्रयत्न करतात.

मात्र, तेथील पोलीस यंत्रणा खूप चांगली असल्यामुळे त्यांना असे प्रकार घडवून देत नाहीत. निश्चितपणे असे प्रकार सरकार म्हणून आम्ही यापुढे होऊ देणार नाही यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असा इशारा फडणवीस यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संतप्त ग्रामस्थांचा मंत्र्यांवर काठ्यांनी हल्ला; आमदारासह अंगरक्षक जखमी, एक किलोमीटर धावत जात गाडीपर्यंत पोहोचले, अन्यथा...

Bajrang Sonawane On Laxman Hake: हाकेंच्या आरोपांना उत्तर, संस्कारच काढले | Beed Politics | Sakal News

Pimpri Traffic : कुठूनही धावा, कसेही चालवा, कुठेही ‘थांबा’, खासगी बसचालकांच्या मनमानीमुळे वाहतुकीचा खोळंबा

Latest Maharashtra News Updates : राज ठाकरेंच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी देवेंद्र फडणवीस जाणार

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवात गोंगाट नको, जल्लोष हवा; ‘डीजे’ टाळून पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT