bjp ashish shelar on shivsena ncp and congress over uddhav thackeray dasara melava  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Dasara Melava: "शिवड्याच्या चटणीला बिर्याणीचा मसाला, हातच्या..."; शेलारांची सेनेवर खोचक टीका

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर भाजपच्या मदतीने राज्यात शिंदे पडणवीस सरकार स्थापन झालं, त्यानंतर शिंदे गट आणि शिवसेना अनेक वेळा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. दरम्यान आता राज्यात दसरा मेळाव्यावरून दोन्ही गटांमध्ये वाद सुरू आहे. शिंदे गटाला शिवतीर्थ तर शिंदे गटाला मुंबईतील बीकेसी मैदान मिळाले आहे. दसरा मेळाव्यासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. यादरम्यान भाजप देखील मागे नसून दसरा मेळाव्यावरून भाजपने देखील शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

भाजपचे नेते अशिष शेलार यांनी एक कवीता ट्विटरवर पोस्ट केली आहे, यामध्ये त्यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. शेलारांनी कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा संदर्भ देतो शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे, त्यांनी लिहिले आहे की, "कॉंग्रेसच्या भारत जोडोला पेंग्विन सेनेची साथ, दसरा मेळाव्याच्या गर्दीसाठी कॉंग्रेस देणार हात!"

पुढे शेलार म्हणातात की, "सगळा गोंधळ घालून, घड्याळ बघा कसे नामानिराळे, संसार तिघांचा, प्रगती पाळणा मात्र राष्ट्रवादीचा हले...". महाविकास आघाडीतील कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांवर त्यांनी टीका केली आहे. "काय तो भारत जोडो...काय तो पेग्विन सेनेचा दसरा... शिववड्याच्या चटणीला बिर्याणीचा मसाला, हातच्या कंकणाला आरसा कशाला? सगळं कसं ok मध्ये आहे!" असेही शेलार त्यांच्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

दरम्यान मुंबईतील शिवाजी पार्क आणि बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा होणार आहे. यासाठी दोन्ही गटांकडून जोरदार तयारीदेखील सुरू करण्यात आली आहे. या दसरा मेळाव्याच्या भाषणात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे त्यासोबतच शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटाकडून घेण्यात येणाऱ्या त्यांच्या पहिल्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Board Exam : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! बोर्ड परीक्षांचे 'फायनल' वेळापत्रक जाहीर, 'या' तारखेपासून परीक्षा सुरू

Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जच्या डोळ्यांमध्ये अश्रू; ऑस्ट्रेलियावरील ऐतिहासिक विजयानंतर भावुक

Kolhapur Faermers : ऊसदर आंदोलनाला हिंसक वळण आल्यास कठोर कारवाईचा शिरोळ पोलिसांचा इशारा

Chh. Sambhajinager Crime: भाजी विक्रेत्यावर सपासप वार; तोंडाला रुमाल बांधून फिल्मी स्टाइल हल्ला करीत घेतला जीव

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज छत्तीसगड दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT