Eknath shinde Amit Shah Sakal
महाराष्ट्र बातम्या

Amit Shah: मुंबईतील ताकदीबाबत भाजपला आत्मविश्वास; CM शिंदेंच्या बळाचाही शहांकडून आढावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बळाचाही अमित शहांकडून आढावा

सकाळ डिजिटल टीम

‘मुंबईतील महापालिका निवडणुकीत पक्षाची कामगिरी चांगली असेल, विकास कामांमुळे जनता पक्षाबद्दल सकारात्मक वेगळा विचार करते आहे,’ असा विश्वास राज्यातील भाजप नेत्यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर व्यक्त केला. कृषी उत्पन्न बाजार समितीतील निकालांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकाऱ्यांना मुंबईत सहानुभूती मिळते आहे काय, याचा विचारही आता सुरु करण्यात आला आहे. अमित शहा यांनी यासंदर्भातील सर्व बाबींचा आजच्या भेटीत सविस्तर ऊहापोह केल्याचे सांगण्यात येते आहे.

कुटुंबातील एका विवाह समारंभासाठी मुंबईत आलेल्या अमित शहा यांनी विलेपार्ले येथे आमदार पराग अळवणी यांनी आयोजित केलेल्या ‘मन की बात’ कार्यक्रमाला हजेरी लावली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या वेळी उपस्थित होते. शहांच्या या मुंबई भेटीमुळे मॉरिशस दौऱ्याहून नागपूरला ‘मन की बात’ ऐकण्याचा पूर्वनियोजित कार्यक्रम सोडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत थांबले, तर बंगळूर येथे प्रचारासाठी गेलेले मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलारही तातडीने एक दिवसासाठी परत आले. ‘मन की बात’च्या प्रसारणानंतर पार्ल्यातील नागरिकांना भेटून शहा लगेच अळवणी यांच्या घरी पोहोचले. तेथे ज्येष्ठ नेते अमरीशभाई पटेल यांच्याशी संवाद साधल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी शहांनी संवाद साधला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शेलारही यावेळी उपस्थित होते.

या नेत्यांशी झालेल्या संवादात अमित शहा यांनी मुंबईतील स्थितीचा आढावा घेतला. विकासकामे जनतेच्या पसंतीस पडत असून मुंबईकरांचा मूड हा आता राष्ट्रीय स्तराप्रमाणेच मोदींना कौल देणारा आहे, असा विश्वास या नेत्यांनी व्यक्त केला. शिंदे सरकारने घेतलेला मुंबईतील वॉर्डांची संख्या २२७ करण्याबाबत न्यायालयाचा निकाल लक्षात घेता पुनर्सीमांकन तसेच मतदारयाद्यांची प्रक्रीया पूर्ण करण्यासाठी किमान तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागेल. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न अद्याप सर्वोच्च न्यायालयात आहे, असेही त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. ‘मुंबई महापालिका जिंकून बदला घ्या’, असे आवाहन अमित शहा यांनी गणेशोत्सवादरम्यानच्या भेटीत भाजप कार्यकर्त्यांना केले होते. मुंबईतील परिस्थिती तसेच महाराष्ट्रातले वातावरण यावर आज बैठकीत चर्चा झाली. मुंबईतील छोट्या छोट्या घटकांना समवेत घेत त्यांचे प्रश्न सोडविण्याची योजना भाजपने तयार केली आहे, त्याचा गोषवाराही सांगण्यात आला. फुटीनंतर उद्धव ठाकरे यांना प्रचंड सहानुभूती मिळत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. त्याबद्दलचा धांडोळाही चर्चेचा विषय होता, असे सांगण्यात आले.

विजयाबद्दल चाचपणी

शिंदे गटाच्या आमदारांना ग्रामीण भागात पुरेसे अपेक्षित यश मिळालेले नाही. त्यामुळे मुंबईत काय होईल? ‘मातोश्री’वर निष्ठा असलेले ४० नगरसेवक प्रवेशाला उत्सुक होते त्यातील कितीजण पुन्हा जिंकू शकतील, त्यांच्या येण्यामागचे कारण काय यावर सविस्तर मंथन झाल्याचेही समजते. विकासकामे ही मुंबईची तहान आहे. त्या आधारावरच या वेळी युतीला मते मिळतील, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी वर्तवल्याचेही सांगण्यात येते आहे. मात्र, मुंबईतील विजयाबद्दल तिन्ही नेत्यांनी सखोल चर्चा सुरु ठेवणे आवश्यक असल्याचे एका ज्येष्ठाने नमूद केले. लग्नसमारंभानंतर दिल्लीकडे रवाना होण्यापूर्वी संध्याकाळी पुन्हा एकदा या नेत्यांनी बंद दरवाजाआड चर्चा केल्याचे समजते. अमित शहा आणि एकनाथ शिंदे या दोघांनीच काही मिनिटे चर्चा केली, असेही सांगितले जात होते पण या चर्चेस दुजोरा मिळू शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचं 'Arrest Warrant' घेवून नाशिक पोलिस मुंबईतील लीलावती रूग्णालयात दाखल!

Doctors Prescription: आता डॉक्टरांना स्पष्ट प्रिस्क्रिप्शन लिहिणे बंधनकारक! एनएमसीचा कठोर आदेश; निर्णयामागचं कारण काय?

IPL 2026: 'बाकी फ्रँचायझी झोपल्या असताना मुंबई इंडियन्सने संधी साधली' R Ashwin ला नेमकं काय म्हणतोय?

Maharashtra Cabinet Reshuffle : राज्य मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला वेग; वसमतचे आमदार राजू नवघरे मंत्री होण्याची दाट शक्यता!

Bhimashankar History : ८० वर्षांनंतर भीमाशंकरची सावली पुन्हा; जुन्नर–आंबेगावात नरभक्षक बिबट्यांची दहशत!

SCROLL FOR NEXT