Devendra_Fadnavis_Metro 
महाराष्ट्र बातम्या

देवेंद्र फडणवीस यांच्या 'मेट्रो ट्विट'ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्युत्तर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची मैत्री आणि युती सर्वज्ञात आहे. पण २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर ती तुटली. आणि शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला हाताशी घेत महाविकास आघाडी केली. त्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडी हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनले आहेत. माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या ट्विटमुळे पुन्हा एकदा हे द्वंद्व रंगले आहे.

फडणवीस काही कारणास्तव नवी दिल्ली येथे गेले होते. त्यावेळी मेट्रोमधून प्रवास करण्याचा त्यांना योग आला. या प्रवासाबाबत त्यांनी ट्विटरवरून एक पोस्ट केली आहे. फडणवीस यांनी दिल्ली मेट्रोतून प्रवास करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. ट्रॅफिकमध्ये लागणारा वेळ मेट्रोमुळे वाचल्याचेही त्यांनी म्हटले आहे आणि मुंबई मेट्रोतून कधी प्रवास करता येईल? असा सवाल महाविकास आघाडी सरकारपुढे उपस्थित केला आहे.  

फडणवीस यांच्या या ट्विटला राष्ट्रवादीकडून उत्तर आलं आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली मेट्रोतील फोटो ट्विट करत मुंबई मेट्रोचे काम कधी पूर्ण होईल, अशी विचारणा केली. मुंबई मेट्रोचे काम जलद गतीने पूर्ण करण्याबाबत महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध असल्याचे तपासे यांनी ट्विट करत सांगितले आहे. 

मुंबई मेट्रो-३ प्रकल्प महाविकास आघाडी सरकार लवकरच पूर्ण करेल, यात शंका नाही. केंद्र शासनाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा अडथळा न आणता हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारकडून मदत झाली, तर मुंबईकरांना दिलासा मिळेल. आणि मुंबईकरांचीही हीच अपेक्षा आहे, असं तपासे यांनी म्हटलं आहे. 

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT