BJP devendra fadnvis reaction after bjp win 5 seats in vidhan parishad election 2022  Sakal
महाराष्ट्र बातम्या

विधान परिषदेतील विजयानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यसभेच्या पाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणूकीत देखील भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

फडणवीस म्हणाले की, विधान परिषदेच्या निवडणूकीत पाचही उमेदवार निवडूण आले आहेत, आम्ही राज्यसभेच्या निवडणूकीत आम्ही १२३ मते घेतली होती आता १३४ मते घेतली आहेत असे त्यांनी सांगीतले. महाविकास आघाडीमध्ये प्रचंड नाराजी आहे, सरकारवर आमदारांचा विश्वास नाहीये म्हणून आमदारांनी आम्हाला मते दिली असे फडणवीसांनी यावेळी सांगितले.

यावेळी बोलतान फडणवीसांनी मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांचे आभार देखील यावेळी त्यांनी मानले, पाचव्या उमेदवारासाठी आमच्याकडे एकही मत नव्हतं, तरीही आम्ही कॉंग्रेसच्या दोन्ही उमेदवारांपेक्षा जास्त मतं घेतली असे फडणवीस यावेळी म्हणाले. या निकालानंतर महाराष्ट्रात परिवर्तनाची नांदी पाहायला मिळाली असे ते म्हणाले, या सरकारच्या विरोधातील असंतोष समोर आला आहे, यापुढे असाच संघर्ष सुरू राहील आणि लोकाभिमुख सरकार आणल्यानंतरच तो थांबेल असे देखील फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, चमत्कार मी मानत नाही, असंतोष मतांमध्ये परिवर्तीत झाला आहे. तो वाढत राहीला तर काय होऊ शकतो तेच या निकालाने दाखवून दिलं असे फडणवीस म्हणाले. कोणाची किती मतं फुटली ते आम्हाला माहिती आहे, मी सगळ्या आमदारांचे आणि अपक्षांचे आभार मानतो ज्यांनी आमचे पाच उमेदवार निवडून आणले. आमचा संघर्ष जनतेसाठी आहे सत्तेसाठी नाही असे देखील फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

भाजपच्या विजयाचे शिल्पकार ठरलेल्या फडणवीसांनी विधान परिषदेतील विजयानंतर ट्वीट केलं आहे, ते म्हणाले आहेत की, 3 पैकी 3 आणि आता 5 पैकी 5! राज्यसभा असो की विधानपरिषद विजेता फक्त भाजपाच ! जय महाराष्ट्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan : पुणे महापालिकेतर्फे दीड दिवसाच्या गणपती विसर्जनाची तयारी पूर्ण

Ganesh Chaturthi 2025: गणोशोत्सवात गोडधोड खाऊनही स्वतःला हेल्दी आणि फिट ठेवण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Manoj Jarange: मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाची तातडीची बैठक

Video : चुकीचं काम करताना पोलिसांना सापडली; भिऊन महिलेने फाडले स्वतःचेचं कपडे, अश्लीलतेची हद्द पार करणारा व्हिडिओ व्हायरल

Latest Maharashtra News Updates : नागपूरमध्ये वीज पडून दोघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT