Chitra wagh_Pankaja Munde_Sushma Andhare
Chitra wagh_Pankaja Munde_Sushma Andhare 
महाराष्ट्र

Sushma Andhare: भाजप पंकजा मुंडेंना रिप्लेस करण्यासाठी चित्रा वाघ यांना पुढे आणतंय - सुषमा अंधारे

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : पंकजा मुंडेंना रिप्लेस करण्यासाठी भाजप चित्रा वाघ यांना पुढे आणत आहे, असा आरोप शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. तसेच भाजपमधील बायकांना काही कामं नाहीत, अशा शब्दांत त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे. (BJP is bringing forward Chitra Wagh to replace Pankaja Munde says Sushma Andhare)

अंधारे म्हणाल्या, "ज्या बायकांना चळवळीचा बेस नाही त्यांना भाजप राजकारणात आणतंय. पंकजा मुंडेंचा मास बेस आहे. मराठवाड्यात त्यांना मानणारा वर्ग आहे. भाजपच्या अनेक जागा या पंकजा मुंडे यांच्यामुळं निवडून आल्या आहेत. मोनका राजळे, नमिता मुंदडा, बुलढाण्याची जागा असेल अशा अनेक जागा पंकजा मुंडेंमुळं निवडून आल्या आहेत हे त्रिवार सत्य आहे"

या पंकजा मुंडेंना रिप्लेस करण्यासाठी भाजप ज्या बायकांना चळवळीचा बेसच नाही त्यांना पुढे आणण्याचा केविलवाणा प्रयत्न करतंय. उलट या सर्व बायकांना आपलं राजकीय अस्तित्व जपायचं असेल तर त्यांनी पंकजा मुंडेंकडून शकलं पाहिजे. स्टेटमेंट काय द्यावेत, कसे द्यावेत, किती काम करावं. नुसत्या नॉन इश्यूजवर उठसूठ पत्रकार परिषदा घेणं यानं काही काम होत नसतं, अशा शब्दांत अंधारे यांनी भाजपवर सडकून टीका केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : मतदान केंद्रावर मतदारांचे होणार फूल देऊन स्वागत; टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT