MVA Esakal
महाराष्ट्र बातम्या

MVA: 'सुप्रिया ताई मुख्यमंत्री तर आदित्य उपमुख्यमंत्री होणार...', BJP नेत्याचा खळबळजनक दावा

ठाकरे-पवारांचा फॉर्म्युला समजल्यामुळेच शिवसेनेतील आमदारांनी उठाव केला

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुख्यमंत्री पदाच्या अनेक चर्चा रंगल्या आहेत. अशातच भाजपने मोठा दावा केला आहे. 'चालू पंचवार्षिकमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहतील. मात्र, २०२४मध्ये सुप्रिया सुळे मुख्यमंत्री, तर आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी निश्चित केला होता असा दावा भाजपच्या बड्या नेत्याने केला आहे.' (Latest Marathi News)

तर पुढे ते म्हणाले कि, 'जाणीवपूर्वक शिवसेनेचे कमी आमदार निवडून आणायचे, असेही ठरले होते. ही गोष्ट समोर आल्यामुळे शिवसेनेतील आमदारांनी उठाव केला,' असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. 'मोदी ९' अभियानांतर्गत भांडारकर प्राच्यविद्या संस्थेत आयोजित केलेल्या पक्षाच्या 'टिफीन' बैठकीनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.(Latest Marathi News)

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले कि, 'मविआचे सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरे मंत्रालयामध्ये येत नव्हते. त्यांच्या खिशाला कधी पेनही नसायचा. तर, अजित पवार उशिरापर्यंत मंत्रालयात थांबून काम करत असे. तर शिवसेनेच्या आमदारांची कामे होत नव्हती.'(Latest Marathi News)

तर '२०२४मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने शंभर आमदार निवडून आणण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यामुळे आपण निवडून कसे येणार, अशी भिती शिवसेना आमदारांना वाटत असल्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरेंना सोडलं असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हंटलं आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malegaon News : 'नकाशा दाखवा, मगच झाडाला हात लावा'; ग्रामपंचायत सदस्याच्या विरोधामुळे संतप्त शेतकऱ्यांनी चार तास रस्ता रोखला!

Short-Term Career Course: करिअरला द्या नवे वळण! ॲडव्हान्स डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग तरुणांचे आवडते शॉर्ट टर्म कोर्स

Astrology Predictions 2026: ‘या’ राशींच्या लोकांच्या नशिबाला पंख फुटणार, गुरु ग्रह देईल यश, धन आणि शुभ फलांची भेट!

Latest Marathi Live News Update : गावठाणची जागा आदानी समूहाला दिल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा ट्रस्टचा इशारा

Yeola Criem : येवला पोलिसांनी उद्ध्वस्त केले गांजा तस्करांचे रॅकेट; तब्बल ४ किलो गांजा जप्त, दोन आरोपींना अटक!

SCROLL FOR NEXT