Chandrashekhar Bawankule Love story 
महाराष्ट्र बातम्या

रिक्षा चालवला, दूध विकले... बावनकुळेंची प्यार वाली LOVE STORY

Chandrashekhar Bawankule Love story: तळागाळातील राजकाणी म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांची महाराष्ट्राच्या राजकारणात ओळख आहे.

Sandip Kapde

Chandrashekhar Bawankule Love story: तळागाळातील राजकाणी म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांची महाराष्ट्राच्या राजकारणात ओळख आहे. चंद्रशेखर बावनकुळे २०१९ नंतर भाजपमध्ये फार सक्रिय नव्हते.

मात्र भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची कमान सांभळल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे पुन्हा सक्रिय झाले. बावनकुळे आता सक्रिय राजकारणात आहे. बावनकुळे यांनी त्यांच्या आयुष्यात कही महत्वाच्या घटनांना उजाळा दिला. 

एकनाथ शिंदे यांच्यासरखा बावनकुळे यांनी देखील रीक्षा चालवला आहे. मात्र त्यांनी तो रिक्षा प्रेमासाठी चालवला. दूध देखील विकले. चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची प्रेमकथा एबीपी माझावर बोलतांना सांगितली. 


चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आधी परिस्थीती खूप वाईट होती. आमचे वडील-आजोबा मालगुजार होते. आजोबा इंग्रजांच्या काळात पोलीस पाटील होते. पण एक काळ असा आला की मला लग्न करुन घराच्या बाहेर जावे लागले. कुटुंबाने माझ लग्न मान्य केलं नाही.

माझी पत्नी कुणबी समाजाची होती तर माझा तेली समाज हे घरच्या लोकांना मान्य नव्हते. तेव्हा काही काळ मला घराच्या बाहेर राहावं लागलं. त्यावेळी ग्रज्युएट देखील झालो नव्हतो, सेकंड ईयरला होतो. तेव्हा लग्न केले.  

घरी २०० एक्कर जमीन होती. ८ कुटुंब घरात होते पण वडिलांनी माझे लग्न मान्य केले नाही. त्यानंतर मला १० बाय १० च्या खोलीत राहावे लागले. दुध विकावे लागले, ऑटोरीक्षा देखील चालवला. त्यावेळी परिस्थिती तशी होती म्हणून सर्व गोष्टी कराव्या लागल्या, असे बावनकुळे म्हणाले.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, "त्यावेळी असलेली जमीन आज असती तर ती ४५० कोटींची असती. मात्र ती पॉवर प्रोजेक्टमध्ये गेली. ती जमीन नागपुरला लागून होती. आमची संपूर्ण मालमत्ता गेली. आता दोन एक्कर जमीन शिल्लक आहे. पॉवर प्रोजेक्ट मध्ये गेलेल्या जमिनिच्या बदल्यात आम्हाला पैसे मिळाले. त्यातुन आम्ही पुढे गेलो.

पण लग्न केल्यामुळे असा एक काळ आला की मला ऑटोरीक्षा चालवावा लागला. दुध विकावे लागले. खूपवेळा मला यातना झाल्या. पुन्हा घरच्या लोकांनी आम्हाला स्विकारले, जुने दिवस पुन्हा आयुष्यात आले. तेव्हा चार वर्षाचा वाईट काळ आला होता, तो आजही विसरता येत नाही. तो खूप वाईट काळ होता."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parbhani News: शहराचा पाणीपुरवठा दोन दिवसांत होणार सुरळीत ; मनपाने एक कोटी ८५ लाख भरले; येलदरी, राहटी येथील पाण्याचे पंप सुरू

Iran Israel Conflict : संघर्ष आणखीनच भडकला ! इस्रायलचा इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल क्षेत्रावर हल्ला; ५ ठार

Latest Marathi News Live Update : राजीव गांधी भवन परिसरात संतापजनक प्रकार, चारित्र्याच्या संशयातून पत्नीवर पतीचा हल्ला

Parbhani News: अवकाळीचा महापालिकेला दणका; दलदल, कचरा आला रस्त्यावर ; नालेसफाईचे पितळ पडले उघडे

Ricky Ponting: पंजाब किंग्जची भारतातील स्टार्सभोवती धाकटी संघरचना, पाँटिंगचा दमदार प्लॅन!

SCROLL FOR NEXT