BJP leader Chitra Wagh getting troll on social media
BJP leader Chitra Wagh getting troll on social media  
महाराष्ट्र

तत्त्वांवर बोलल्या भाजपवासी चित्राताई अन् झाल्या ट्रोल!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भाजपला बहुमत असूनही सत्तास्थापन करता आली नाही. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी दिलेली मुदत संपतानाच भाजपने पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट सांगितले की, आम्ही सरकार स्थापन करणार नाही. या निर्णयाचा भाजप नेत्यांनी स्विकार केला. यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट केले. या ट्विटमुळे त्या सोशल मीडियात ट्रोल होताना दिसताहेत.  

भाजपने सरकार स्थापन होऊ शकत नाही, असे जाहीर केल्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी 'सत्तेपेक्षा तत्व महत्वाचे... अभिमानास्पद निर्णय!!!' असे ट्विट केले होते. या ट्विटवरून चित्रा वाघ चांगल्याच ट्रोल झाल्या आहेत. कारण लोकसभा निवडणूकीनंतर राष्ट्रवादीमध्ये बराच काळ काम केल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे सोशल मीडियावर वाघ यांच्या तत्त्वांवरच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनीही त्यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. 'ज्या पक्षाने मान, सन्मान, पद, प्रतिष्ठा दिली, तो पक्ष सोडताना काहींना तत्व आठवली नाही, जी आता आठवायला लागली आहेत,' असा सवाल चाकणकर यांनी वाघ यांना विचारला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT