Devendra Fadnavis Love story sakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis Love story : अमृतामध्ये फडणवीसांना दिसायची 'या' अभिनेत्रीची झलक, वाचा कशी झाली पहिली भेट

देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी हे पहिल्यांदा कसे भेटले आणि त्यांची अनोखी लव्हस्टोरी याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

निकिता जंगले

Devendra Fadnavis Love story : सध्या सगळीकडे वॅलेंनटाईन\ची जोरदार तयारी सुरू आहे. वॅलेनटाईन वीक सुरू झाल्याने प्रेमीयुगुलांसाठी हे दिवस खूप खास असणार आहे. वॅलेनटाईन वीक हा प्रेमाचे प्रतिक म्हणून साजरा केला जातो.

या दिवसांमध्ये अनेक लव्ह स्टोरी बनतात तर काही लव्हस्टोरींना दिशा मिळते. वॅलेनटाईन वीक निमित्त आज आम्ही तुम्हाला अशा नेत्याची लव्हस्टोरी सांगणार आहोत ज्यांचा महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचा वाटा आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी हे पहिल्यांदा कसे भेटले आणि त्यांची अनोखी लव्हस्टोरी याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. (bjp leader Devendra Fadnavis and amruta fadnavis amazing Love story read where and how they meet first time)

देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहून गेले तर सध्या ते उपमुख्यमंत्री पदावर आहे. त्यांचा इथपर्यंतचा राजकीय प्रवास खूप दाडंगा होता. त्यांच्या या प्रवासात त्यांची बायको अमृताचे मोलाचे योगदान राहले.

अमृता या स्वतंत्र विचाराच्या, धाडसी आणि भेधडक व्यक्तीमत्त्व म्हणून प्रचलित आहे. त्या एक उत्तम गायिका आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. अधून मधून त्या राजकीय बाबींवरही वक्तव्य करतात. त्यांच्या बेधडक स्वभावामुळे अनेकदा ट्रोलींगचाही सामना करावा लागला.

देवेंद्र आणि अमृता यांची पहिली भेट कशी झाली?

जेव्हा देवेंद्र यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा ते वधू शोधत होते. या दरम्यान योगायोगाने त्यांचे मित्र शैलेश जोगळेकर यांच्या घरी अमृता यांच्यासोबत त्यांची पहिली भेट झाली.

तासभर बोलल्यानंतर त्यांनी लग्न करायचा निर्णय घेतला. देवेंद्र फडणवीसांना अभिनेत्री काजोल प्रचंड आवडते. विशेष म्हणजे त्यांना अमृतामध्ये अभिनेत्री काजोल दिसायची. २००५ साली त्यांनी लग्न केले. लग्नानंतर कित्येक दिवस अमृता त्यांना सर म्हणून हाक मारायच्या त्यानंतर त्या देवेन म्हणू लागल्या. त्यांना एक दिविजा नावाची मुलगी आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाही त्या अमृता नोकरी करायच्या. लग्नाआधी कसलीच राजकीय पार्श्वभूमी नसताना अमृतांनी महाराष्ट्राच्या युवा राजकारणीसोबत संसार थाटला. अमृताचे आईवडील चारू आणि शरद रानडे डॉक्टर आहेत.

अमृता आणि देवेंद्र फडणवीस हे दिलखूलास व्यक्तिमत्त्व आहे दोघांना कलेची आवड आहे. जेव्हा जेव्हा अमृता यांना ट्रोलींगचा सामना करावा लागला तेव्हा प्रत्येकवेळी देवेंद्र फडणवीसांनी अमृता पण एक स्वतंत्र व्यक्ती आहे आणि तिच्या आवडीच्या गोष्टी करायचा तिला हक्क आहे असं स्पष्ट सांगितलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meenatai Thackeray statue case Update: मोठी बातमी! मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यास २४ तासांच्या आत अटक; गुन्हाही केला कबूल

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

Nagpur Crime : अपघाताच्या विम्याच्या कागदपत्रासाठी मागितले आठ हजार; उपनिरीक्षक, हेडकॉन्स्टेबल एसीबीचा जाळ्यात

Shital Mahajan : स्पेनमध्ये स्कायडायव्हिंग करून शीतल महाजन यांच्या पंतप्रधानांना शुभेच्छा

INDW vs AUSW: टीम इंडियाच्या नारी शक्तीचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा वन डे क्रिकेट इतिहासात असा पराभव कुणी केलाच नव्हता...

SCROLL FOR NEXT