Kirit Somaiya esakal
महाराष्ट्र बातम्या

किरीट सोमय्यांनी जन्माष्टमीच्या कार्यक्रमात वाजवला ढोल, व्हिडिओ व्हायरल

राज्यात मोठ्या उत्साहात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

राज्यात मोठ्या उत्साहात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जात आहे.

मुंबई : राज्यात मोठ्या उत्साहात श्रीकृष्ण जन्माष्टमी (Shri Krishna Janmashtami) साजरी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी दहीहंडीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. कोरोनाच्या दोन वर्षाच्या काळानंतर यंदा प्रथमच मोठ्या उत्साहात जन्माष्टमी साजरी केली जात आहे.

तरुणाईसह राज्य सरकारही मोठ्या दणक्यात दहीहंडी साजरी करताना दिसून येत आहेत. विविध राजकीय नेत्यानी मुंबईतील (Mumbai) वेगवेगळ्या भागात राजकीय नेत्यांनी उपस्थिती लावत दहीहंडीच्या कार्यक्रमात भाग घेतला.

भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनीही दहीहंडी उत्सवात आपला सहभाग नोंदवलाय. यावेळी त्यांनी या जोशात ताशा-ढोल वाजवाण्याचा आनंद घेतला. एवढ्यावरच न थांबता सोमय्यांनी डान्सही केला. त्यांच्या डान्सचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दीड महिन्यांपूर्वी आम्ही 50 थरांची हंडी फोडली : CM एकनाथ शिंदे

राज्यात आज दहिहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. ठाण्यातील टेंभीनाका येथील दहिहंडी उत्सावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय भुकंपाच्या आठवणी जाग्या केल्या. मुख्यमंत्री म्हणाले, या दहीहंडी उत्सवाला येताना मला विशेष आनंद होतो की दिघे साहेबांचं स्वप्न होतं की, एक दिवस ठाण्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे आणि आता ते प्रत्यक्षात आलं आहे. काय त्या माणसाची दूरदृष्टी असेल काय त्यांचे विचार असतील. मला आनंद होतोय की या दहीहंडी उत्सावला मला उपस्थत राहता आलं यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. आम्ही दीड महिन्यापूर्वी सर्वात मोठी राजकीय हंडी फोडली. बाळासाहेबांच्या आणि दिघे साहेबांच्या आशीर्वादानं आम्ही ही हंडी फोडली. यामध्ये आम्ही पन्नास थर लावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकलचा खोळंबा, प्रवाशांचा संताप! मुंबईकडे जाणारी ट्रेन ४० मिनिटं लेट, बदलापूर स्टेशनवर उसळली गर्दी

अहिल्यानगर हादरलं! 'अपहरणानंतर तरुणीवर सामूहिक अत्याचार'; युवतीला मदतीचा बहाणा करून दुचाकीवर बसवलं, ती रडत हाेती अन्..

Kolhapur Politics : पंचायत समिती आरक्षण सोडतीवेळी प्रशासनाची चूक, माजी जिल्हा परिषद सदस्याचा बीपी झाला लो अन्...

Pune Accident: बड्डेच्या शुभेच्छा ऐवजी अंत्यसंस्काराची वेळ! 'दुचाकी खोल खड्ड्यात कोसळून दोन तरुणांचा मृत्यू'; आंबेगाव तालुक्यातील घटना

Latest Marathi News Live Update : RSS कार्यकर्ते भारताचे काही विशेष नागरिक आहेत का?

SCROLL FOR NEXT