Pankaja Munde
Pankaja Munde esakal
महाराष्ट्र

पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण; काळजी घेण्याचे केले आवाहन

निनाद कुलकर्णी

मुंबई - भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना दुसऱ्यांदा करोना संसर्ग झाला असून यावेळी त्यांना करोनाचा नवा विषाणू ओमिक्रॉनचा (Omicron) संसर्ग (Pankaja Munde Covid Positive) झाला आहे. दरम्यान, त्यांना सौम्य लक्षणे जाणवत असून सध्या त्यांना मुंबईतील घरीच क्वारंटाईन करण्यात आले आहे. याबाबत पंकजा मुंडे यांनी स्वतः ट्वीट करत माहिती दिली आहे. (Pankaja Munde Covid Report came positive In Second Time)

दरम्यान बाधितांच्या संपर्कात आल्याचे जाणवल्यानंतर लगेचच स्वतःला विलग केल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच आपल्याला लक्षणे आणि करोना दोन्ही जाणवत असून सर्वांनी काळजी घ्यावी.” असे आवाहन त्यांनी केले आहे. (Pankaja Munde Tweet After Covid Positive)

राज्यात आज 9170 कोरोना बाधित, तर 6 ओमिक्रॉन बाधितांची नोंद

राज्यात दिवसागणिक कोरोना (Corona Cases In Maharashtra) बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून शनिवारीदेखील राज्यात 9170 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 1,475 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. एकट्या मुंबईमध्ये आज 6 (Mumbai Corona Cases) हजार 347 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर एका मृत्यूची नोंद करण्यात आलीय. राज्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या 7 लाख 50 हजार 158 वर पोहचली असून राज्यात आज 6 ओमिक्रॉन बाधितांची नोंद करण्यात आली आल्याने ही संख्या आता 460 वर पोहोचली आहे. राज्यात आज 7 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून ओमिक्रॉन (Omicron Cases In Maharashtra) बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून एकट्या महाराष्ट्रात आतापर्यंत 460 ओमिक्रॉन बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर देशात आतापर्यंत 1437 ओमिक्रॉन (Omicron Count In India) बाधितांची नोंद करण्यात आली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. ओमिक्रॉन व्हेरियंटचे देखील रुग्ण वाढत चालल्याने देशासह राज्याची चिंता वाढली आहे. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात कोरोनाची तिसरी (Corona Third Wave) लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असताना पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक निर्बंध कडक करण्यात आली आहेत. (Covid Appropriate Behavior )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचे गोलंदाज चमकले! चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरातला 147 धावांवरच केलं ऑलआऊट

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

Latest Marathi News Live Update: नारायण राणेंकडे प्रश्न सोडवण्याची हातोटी- राज ठाकरे

SCROLL FOR NEXT