Udyanraje Bhosale 
महाराष्ट्र बातम्या

शिवसेना स्थापनेवेळी वंशजांना विचारले होते का? : उदयनराजे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शिवसेना काढली तेव्हा महाराजांच्या वंशजांना विचारण्यास आले होते का? शिवाजी महाराजांचा सोईप्रमाणे वापर करायचा, असे यांचे काम आहे. शिवाजी महाराजांचे नाव काढून ठाकरे सेना करा, बघा कितीजण पक्षात उरतील. महाशिवआघाडीतून शिव हा शब्द का काढून टाकला याचे उत्तर द्यावे, असे माजी खासदार आणि भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.

जाणता राजा ही उपमा आजकाल काहींना दिली जाते. पण, जाणता राजा हे फक्त आणि फक्त शिवाजी महाराजच होते. दुसरे कोणीही होऊ शकत नाही. शिवाजी महाराजांशी तुलना करणारे पुस्तक प्रकाशित झाल्याने वाईट वाटते, अशी भावनाही उदयनराजेंनी व्यक्त केली.

आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकावरून महाराष्ट्रात आंदोलन झाल्यानंतर आज (मंगळवार) उदयनराजे यांनी पत्रकार परिषद घेत आपली मते मांडली. शिवाजी महाराजांचे वंशजांनी याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. संभाजीराजेंनंतर आता उदयनराजेही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आज पानिपत लढाईचा शौर्यदिन आहे. त्या लढाईत वीरमरण आलेल्यांना आदरांजलीही त्यांनी वाहिली. 

उदयनराजे म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. जगात आदर्श असलेल्या शिवाजी महाराजांशी अनेकदा वेगवेगळ्या व्यक्तींसोबत तुलना केली जाते. बुद्धी गहाण ठेवली आहे का, असे मला वाटते. जे पुस्तक प्रकाशित झाले त्याबद्दल वाईट वाटते. कोणत्याही गोष्टीचे राजकारण करणार नाही. जाणता राजा सध्या अनेक जणांना उपमा दिली जाते. पण, माझ्यामते फक्त शिवाजी महाराजच जाणता राजा आहेत. शिवाजी महाराज युगपुरुष होते, ते कधीतरी जन्मतात. शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून मी कधी मिरवले नाही. मी माझे सौभाग्य समजतो. मागच्या जन्मात पुण्य केल्यानेच मला हे भाग्य लाभले. शिवाजी महाराजांचे गुण अंगाकरणाचा प्रयत्न करा, थेट महाराज बनू नका. शिवाजी महाराजांनी कधीही मतभेद केले नाहीत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: पाच मिनिटांत दुसरे सुवर्ण! हर्ष सिंगची ज्यूदोत 'Golden' कामगिरी; भारतीय जवानाने प्रतिस्पर्धीला आसमान दाखवले

Pune Flood Alert: पुण्यात धोक्याची घंटा! एकतानगरमध्ये ४० कुटुंबांतील १०० नागरिक स्थलांतरित; मुठा नदीतील पातळीत वाढ झाल्याने पाणी घुसले

Asmita Dey won historic Gold : अस्मिता डे हिने 'Golden Score'वर जिंकले सुवर्ण! राष्ट्रकुल स्पर्धेत ज्युदोपटूने इतिहास घडवला, पहिली भारतीय

India Probable Squad 2027 ODI World Cup : विराट कोहली, रोहित शर्मासह ६ खेळाडूंची जागा पक्की! २०२७च्या वन डे वर्ल्ड कपसाठी कशी असेल टीम इंडिया?

Parli Vaijnath: परळीच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडे साकडे; सुनेत्रा पवारांकडून सकारात्मक प्रतिसाद

SCROLL FOR NEXT