Sharad Pawar  esakl
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: भाजपचं मिशन ४५ जाहीर होताच; शरद पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये, पुण्यात घेतली बैठक

शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या बैठकीचे आयोजन

रुपेश नामदास

पुण्यात आज शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची राजकीय भूमिका नेमकी काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून पक्षकार्यर्त्यांसोबत संवाद साधला जाणार आहे.

तसेच प्रत्येक तालुक्याचा अंदाज घेऊन कार्यकर्त्यांना त्यासंबंधी आवश्यक सूचना शरद पवारांकडून कार्यकर्त्यांना दिल्या जाणार आहेत. त्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आली आहे. यावेळी बोलताना इंदापूरचे आमदार दत्ता भरणे यांनी सांगितलं की, पुणे जिल्हयातील शिरूर व बारामती या तालुक्यातील आज बैठक झाली.

या बैठकीत प्रत्येक तालुक्यातील संघटनांच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी या बैठकीत चर्चा झाली, येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या निवडणुकीचा आढाव ही यावेळी घेतला गेला. यावेळी वरीष्ठ नेत्यांची काय मदत घेता येईल याची माहिती यावेळी दिली.

हेही वाचा: ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

राष्ट्रवादीची पुणे जिल्ह्यात ताकद जास्त आहे त्यामुळे अंतर्गत मतभेद देखील आहेत त्यावर तोडगा काढण्या बाबत चर्चा झाली, तर ते पुढं म्हणाले, शिरूर बारामती मध्ये कोणी आलं तर येथ राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारच निवडून येईल. बाहेरच कोणी ही आला तरी लोक इथं राष्ट्रवादीलाच ताकद देतील असा विश्वास या वेळी त्यांनी बोलून दाखवला.

तर अजित पवारांची पाठ राखन करताना म्हणाले, राज्यपाल यांनी केलेल्या वक्तव्यावरून लक्ष हटवण्यासाठी अजितदादा यांच्यावर वर टीका होत आहे, आम्ही स्वराज्य रक्षकच म्हणणार,ज्यांना काय म्हणायच ते म्हणा.

तर या बैठकीत पक्षातील अंतर्गत गटबाजी उफळून आली विषेश म्हणजे पक्ष अध्यक्ष शरद पवार यांच्या समोरचं त्यांमुळे आता शरद पवार काय भुमीका घेणार हे पाहवं लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT