BJP MLA Laxman Jagtap Death
BJP MLA Laxman Jagtap Death Sakal
महाराष्ट्र

BJP MLA Laxman Jagtap Death : कट्टर समर्थक असतानाही पवारांशी 2 वेळा पंगा घेणारे जगताप

दत्ता लवांडे

भाजपचे दमदार आमदार म्हणून ओळख असलेल्या लक्ष्मण जगताप यांची आज सकाळी प्राणज्योत मावळली. वयाच्या ५९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काँग्रेस, राष्ट्रवादी ते भाजप असा प्रवास राहिलेल्या जगताप आजारी असतानाही पुन्हा चर्चेत आले ते राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानासाठी हजर राहिले त्यावेळी. प्रचंड आजारी असतानाही ते व्हीलचेअरवर मतदानासाठी हजर राहिले होते. कुस्तीच्या फडात अनेकांना चितपट केलेल्या जगतापांनी राजकारणातही अनेकांना चितपट केलंय. राष्ट्रवादीचे कट्टर समर्थक असतानाही त्यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात निवडणूक लढवण्याची हिंमत दाखवली होती.

सलग २० वर्षे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नगरसेवक असलेल्या जगतापांनी २००९ साली राष्ट्रवादीने तिकीट दिलं नसतानाही अपक्ष विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यानंतर २०१४ मध्येसुद्धा राष्ट्रवादीने त्यांना तिकीट दिलं नसताना त्यांनी अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांना महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या राज ठाकरेंचा जाहीर पाठिंबा लाभला होता. त्यावेळचा हा किस्सा.

हेही वाचा - ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

लक्ष्मण जगताप म्हणजे पिंपरी चिंचवडमधील राजकारणातील अनभिषक्त सम्राट. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे त्यांना राजकारणातला हेडमास्तर म्हटलं जातं. पिंपरी चिंचवडचा कारभार त्यांनी अनेक वर्षे एकहाती संभाळला आहे. ते १९८६ पासून २००६ पर्यंत राजकारणात आहे. ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सलग २० वर्षे नगरसेवक होते. १९९३ ला ते स्थायी समितीचे अध्यक्ष झाले त्यानंतर ते २००२ मध्ये महापालिकेचे महापौर झाले होते.

ते सुरूवातीपासूनच राष्ट्रवादीचे हक्काचे नेते होते. पण २००९ साली विधानसभेसाठी तिकीट न मिळाल्याने त्यांनी थेट पवारांशी पंगा घेत चिंचवड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली आणि निवडूनही आले होते. पण निकाल लागल्यावर त्यांनी परत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. आपल्यावर अन्याय होत असेल तर त्याविरुद्ध जोरदार बंड करणे ही लक्ष्मण जगताप यांची खासियत होती. मग समोर कितीही मोठा नेता का असेना.

पण त्यांची खरी इच्छा होती खासदारकीची. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडून तिकीट न मिळाल्याने अपक्ष लढण्याचा निर्धार केला. त्यांनी पुन्हा एकदा पवारांशी पंगा घेत मावळ लोकसभा मतदारसंघातून अर्ज भरला होता. पण त्यांच्या जाण्याने राष्ट्रवादीने सेनेचे प्रवक्ते असणाऱ्या राहुल नार्वेकर यांना राष्ट्रवादीमध्ये आणून मावळ मध्ये उभं केलं. तर शिवसेनेने श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिली होती. पण पारड मात्र लक्ष्मण जगतापांच्या बाजूने झुकलेलं होतं. अशातच या रणधुमाळीत एंट्री झाली ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची.

खरं तर लक्ष्मण जगतापांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती पण शेकापने त्यांना जाहीर पाठिंबा देत आपल्या पक्षात घेतलं. अजित पवारांचे उजवे हात असलेल्या जगतापांनी शेकापकडून घेतलेल्या उमेदवारीमुळे राज्यभर चर्चा रंगली होती. त्यानंतर मनसेनेही मावळमधून आपला उमेदवार लोकसभेसाठी उतरायचं ठरवलं. शिवसेनेने डावललेल्या गजानन बाबर यांना मनसेने उमेदवारी देण्याचं ठरवलं पण त्यांनी मनसेची उमेदवारी नाकारून आपल्या पक्षाशी एकनिष्ठता दाखवली होती. त्यानंतर मनसेने लक्ष्मण जगतापांना आपला पाठिंबा जाहीर केला आणि राजकारणातील नवं समीकरण उदयास आलं.

लक्ष्मण जगतापांना त्यावेळी राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांनी चॅलेंज केलं होतं. "हिंमत असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणूक लढवा" असं आव्हान करण्यात आल्यावर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि रिंगणात उतरले. त्यानंतर मावळ लोकसभा निवडणूक हायव्होल्टेज होणार याची चुणूक लागली होती. मावळमध्ये मनसेचं वजन चांगलं वाढलं होतं. त्यांचा पाठिंबा असल्यामुळे जगतापांना निश्चितच फायदा होणार होता. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जगतापांसाठी सभा घेतली आणि त्यांचा प्रचार केला होता. राज ठाकरे यांनी चिंचवड येथे जाहीर सभा घेतली पण पनवेल येथे सभा घेण्यासाठी दिलेलं आश्वासन त्यांना पूर्ण करता आलं नाही. याचा जोरदार फटका जगतापांना बसला होता. पुढे सभांदरम्यान आचारसंहिता मोडल्याने शेकाप नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

इकडे राहुल नार्वेकर यांनीही जगतापांच्या मताला मोठं खिंडार पाडलं होतं. याचा फायदा शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांना झाला आणि राजकारणाचे हेडमास्तर लक्ष्मण जगतापांचा दारूण पराभव झाला. पुढे त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि विधानसभा निवडणूक जिंकली. पुढे पिंपरी चिंचवड महानगरपालिका भाजपाच्या हातात येण्यामागे लक्ष्मण जगतापांचे मोठे योगदान आहे. २०१९ मधील लोकसभा निवडणुकांमध्येही त्यांना तिकीट मिळालं नाही. आजही पिंपरी चिंचवड भागात कार्यकर्त्यांचं सर्वात मोठं जाळं लक्ष्मण जगताप यांचं आहे मात्र त्यांचं खासदारकीचं स्वप्न अपुरं राहिलं.त्यानंतर त्यांनी भाजपकडून विधानसभेची निवडणूक लढवली आणि

पुढे त्यांना आजारांनी ग्रासलं. त्यांना बऱ्याच वेळा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तब्बल ५० दिवसांच्या उपचारानंतर त्यांना पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमधून सोडण्यात आलं. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना परत रूग्णालयात दाखल करण्यात आलं. या दरम्यान, अमेरिकेहून मागविलेल्या सुमारे एक लाख रुपयांच्या इंजेक्शनमुळे त्यांच्या प्रकृतीत कमालीची सुधारणा झाली होती. बेडरेस्टवर असतानाही त्यांनी राज्यसभा, विधानपरिषद निवडणुकांच्या मतदानासाठी हजेरी लावली होती. पण अखेर शेतकरी पुत्र असलेले पहिलवान लक्ष्मण जगतापांनी आज अखेरचा श्वास घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT