bjp MLA Nitesh Rane offers Students to watch Kashmir Files movie for 100 rupees  sakal media
महाराष्ट्र बातम्या

100 रुपयात बघा 'काश्मिर फाईल्स'; नितेश राणेंची विद्यार्थ्यांना ऑफर

सकाळ डिजिटल टीम

सध्या विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केलेला द काश्मिर फाईल्स हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटावरुन अनेक नवे वाद पेटत आहेत, सोबतच देशभरातील अनेक राज्यांनी हा चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय देखील घेतला आहे. दरम्यान नितेश राणे यांनी हा चित्रपट राज्यात करमुक्त करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती, मात्र ती पुर्ण झाली नाही. यानंतर आता नितेश राणे यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शंभर रुपयांत हा चित्रपट पाहाण्याची ऑफर दिली आहे.

आमदार नितेश राणे यांनी माहाविद्यालयीन तरुणांसाठी खास सवलत जाहीर केली आहे. या ऑफरनुसार लक्ष्मी थिएटर कणकवली येथे दिनांक २१-०३-२०२२ पासून सकाळी ९ व दुपारी १२ वाजताच्या शोमध्ये महाविद्यालयीन तरुणांना १०० रुपयांमध्ये द काश्मिर फाईल्स हा चित्रपट पाहाता येणार आहे. जास्तीत जास्त तरुणांनी हा चित्रपट पाहावा असे अवाहन केले आहे.

दरम्यान महाराष्ट्रातही चित्रपट करमुक्त करण्याची मागणी भाजपने केली होती. मात्र सध्या हा चित्रपट राज्यात करमुक्त केला जाणार नसल्याचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काल स्पष्ट केलं, त्यांनी केंद्रा सरकारने कर सवलत दिल्यास सर्व राज्यांनाही लागू होईल असे म्हटले होते. उत्तर प्रदेशसह गोवा, मध्य प्रदेश, कर्नाटक, हरियाणा आणि गुजरात या भाजपशासित राज्यांनी हा चित्रपट करमुक्त केला गेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Giorgia Meloni wishes PM Modi: मोदींना इटलीच्या पंतप्रधान मेलोनींकडून 'सेल्फी'वाल्या मेसेजद्वारे खास शुभेच्छा, म्हणाल्या...

Asia Cup 2025: पाकिस्तान संघाचा UAE विरूद्धच्या सामन्यावर बहिष्कार? खेळाडूंना हॉटेलमध्येच थांबण्याचे आदेश; जाणून घ्या प्रकरण

Latest Marathi News Updates : पाकिस्तानने आशिया कपवर बहिष्काराचा निर्णय बदलला? खेळाडूंनी सोडलं हॉटेल

Jalgaon News : जळगाव विमानसेवा ठप्प: अहमदाबाद विमान दीड महिन्यापासून बंद, प्रवाशांची गैरसोय!

Facial Surgery Success Story: "सुसाईड डिसीज"वर यशस्वी शस्त्रक्रिया - ठाण्यात दोन रुग्णांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

SCROLL FOR NEXT