मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) जो पर्यंत माफी मागणार नाही तोपर्यंत त्यांना अयोध्येत (Ayodhya) प्रवेश करू देणार नाही, अशी धमकी देणाऱ्या भाजप खासदार बृजभूषण सिंह यांना मनेसेनं प्रत्युत्तर दिले आहे. मनसे छोट्या-मोठ्या धमक्यांना भीक घालत नाही असे, प्रतुत्तर मनसे नेते अभिजित पानसे यांनी दिले आहे. (MNS Leader Abhijeet Panase On BJP MP Brujbhushan Singh )
पानसे म्हणाले की, सिंह यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचा फोन गेला आहे. त्यामुळे ते आता शांत होतील. मात्र, धमकी कुणी दिली हे महत्त्वाचे नाही. परंतु, मनसे, महाराष्ट्र नवनिर्माणसेनेचे सैनिक आणि स्वतः राज ठाकरे अशा पोकळ धमक्यांना घाबरत नसल्याचे पानसे यांनी स्पष्ट केले. राज ठाकरेंबद्दल बोलल्यानंतर प्रसिद्ध मिळते अशी सिंह यांची भावना असेल आणि ते प्रसिद्ध झालेले आहेत. मात्र त्यांच्या या इशाऱ्यानंतर योगीजींचा त्यांना फोन गेला असून त्यांना गप्प राहण्यास सांगण्यात आले आहे.
राज ठाकरे पुढील महिन्यात अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्याआधी उत्तर प्रदेश व बिहारच्या लोकांवर मनसेच्या लोकांनी केलेल्या हल्ल्यांबद्दल आणि त्यांच्या अपमानाबाबत राज ठाकरे यांनी हात जोडून या राज्यांसह संपूर्ण उत्तर भारताच्या जनतेची जाहीर माफी मागावी असे विधान भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brujbhushan Singh) यांनी केले होते. तसेच माफी मागितल्याशिवाय त्यांना अयोध्येत घुसू देणार नाही, असा इशारा भाजप (BJP) खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी दिला होता.
राज ठाकरेंचा 5 जूनला अयोध्या दौऱ्यावर
राज ठाकरे यांनी ५ जून रोजी अयोध्या दौरा जाहीर केला आहे. राम मंदिर आंदोलनाशी ठाकरे परिवाराचा काही संबंध नाही व त्यांना याचे देणेघेणे नाही असाही हल्लाबोल ब्रिजभूषण यांनी केला असून जोवर ठाकरे उत्तर भारतीयांच्या लोकांची माफी मागत नाहीत तोवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी त्यांना किंवा ठाकरे परिवारालाही अजिबात भेटू नये असेही त्यांनी आवाहन त्यांनी केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.