महाराष्ट्र बातम्या

अजित पवार अज्ञानी आहेत, नारायण राणेंचा उपमुख्यमंत्र्यावर पलटवार

नामदेव कुंभार

जन आशिर्वाद यात्रेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. कणकवली येथे पत्रकार परिषदेत त्यांनी अजित पवार अज्ञानी आहेत, त्यांनी स्वत:च्या खात्याचं पाहावं असा प्रहार केला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खात्याकडून राज्याला निधी मिळण्याबाबत प्रश्न विचारला असता, सुक्ष्म आणि लहान खात्यातून आम्हाला काय निधी मिळणार?, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कणकवली येथे प्रश्न विचारला असता अजित पवार अज्ञानी आहेत, असा पलटवार त्यांनी उपमुख्यमंत्र्यांवर केला.

"अद्याप राष्ट्रवादीकडे वळलो नाही. तुमच्या तिजोरीत खडकडाट असल्याने केंद्राकडे हात पसरले, राज्यातील शेतकऱ्यांना, पुरग्रस्तांना , एसटीचे पगार देण्यासाठी पैसा नाही. ही राज्याची अवस्था आहे. एका रात्रीत आपल्यावरी गुन्हे काढून टाकण्यासाठी पदाची शपत घेणाऱ्या अजित पवारांनी मला तोंड उघडायला लावू नये," असा इशाराही राणे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. कणकवली येथील प्रहार भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेला नारायण राणे यांच्यासह विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, जि. प. अध्यक्षा संजना सावंत, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली आदी मान्यवर उपस्थित होते.

अजित पवार काय म्हणाले होते?

राणे यांच्या खात्याकडून राज्याला निधी मिळण्याबाबत प्रश्न विचारला असता, सुक्ष्म आणि लहान खात्यातून आम्हाला काय निधी मिळणार?, केंद्रातून निधी द्यायचाच म्हटलं तर नितीन गडकरी यांचं खातं निधी देऊ शकतं. गडकरींनी याआधी बराच निधी दिला आहे. राज्यात अनेक कामेही प्रगतीपथावर आहेत, असे अजित पवार म्हणाले होते.

यात्रेत काही ठिकाणी मांजर आडवी गेली

यात्रेत काही ठिकाणी मांजर आडवी झाली आणि अपशकून झाले. आता अग्रलेख वैगेरे येत आहेत. आधी आपली मुलं किती पराक्रमी आहेत बघा. संजय राऊत यांनी आधी मालकाची मुलं काय करत आहेत हे पहावं. संजय राऊत आम्हाला बोलण्यासाठी, माहिती काढण्यासाठी प्रवृत्त करत आहेत, असे राणे म्हणाले.

रिकॉर्ड ब्रेक गर्दी - राणे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझी केंद्रीय मंत्री म्हणून निवड केली. पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे जनआशीर्वाद यात्रा काढण्यात आली आहे. सरकारने केलेल्या कामाची माहिती या यात्रेच्या माध्यमातून देण्यात येत आहे. जनआशीर्वाद यात्रेला दहा दिवस झालेत. लोकांनी मोठा प्रतिसाद दिला. लोकांनी खूप गर्दी केली, रिकॉर्ड ब्रेक गर्दी झाली. पत्रकारांनी मला खूप प्रसिद्धी दिली. पैसे देऊनही इतकी प्रसिद्धी मिळत नाही. यासाठी पत्रकारांचे मी आभार मानतो, अशी उपहासात्मक टिप्पणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली.

उद्योजक व्हा - राणेंचं आवाहन

नारायण राणे म्हणाले की, 'जन आशीर्वाद यात्रेचा आज दहावा दिवस आहे. मुंबई ते सिंधुदुर्ग अशी ही यात्रा सुरू आहे. लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिलाय, उशिरा मी जाऊनही लोक थांबत होते. मला मोठी प्रसिद्धी पत्रकार मित्रांनी दिली. पैसे देऊनही एवढी प्रसिद्धी मिळत नाही. रोजगार निर्माण करणारा हा विभाग आहे. देशाच्या विकासाला साथ देणारा हा विभाग आहे. मी सिंधुदुर्गवासीयांना सांगतो, तुम्हाला मला साथ द्यायची असेल, तर उद्योजक व्हा.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT