BJP Replied Sharad Pune Metro e sakal
महाराष्ट्र बातम्या

'आदरणीय पवारसाहेब तुमची अडचण...', भाजपचा पुणे मेट्रोवरून टोला

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आज पुणे दौऱ्यावर आहेत. आज ते पुणे मेट्रोचं उद्घाटन देखील करणार आहेत. त्यावरूनच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोदींना खोचक टोला लगावला होता. त्यालाच आता भाजपकडून (BJP) उत्तर देण्यात आले आहे. भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पवारांवर निशाणा साधला आहे.

पुणे मेट्रोचं काम अद्यापही पूर्ण झालं नाही. तरीही पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रोचं उद्घाटन होत आहे, असा टोला पवारांनी लगावला होता. त्यालाच भाजपकडून उत्तर देण्यात आलं आहे. पुणे मेट्रोचे काम अर्धवट आहे तर लोक झोपेत असताना लपून-छपून ट्रायल तुम्हीच घेतली होती ना? असा सवाल भाजपकडून पवारांना विचारण्यात आला आहे. मोदी ज्या प्रकल्पाचे भूमीपूजन आणि लोकार्पण करतात ते तुम्हाला ५० वर्षांच्या कारकिर्दीत जमलं नाही. तुमची नेमकी हीच अडचण आहे, अशी टीकाही पवारांनी करण्यात आली.

शरद पवार नेमकं काय म्हणाले होते? -

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. कर्वे रस्त्यावरील गरवारे महाविद्यालय येथे पुणे मेट्रोचे उद्घाटन करून ते मेट्रोने आनंदनगपर्यंतचा प्रवास करणार आहेत. पुण्यात शनिवारी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पवारांनी मोदींना टोला लगावला होता. पंतप्रधान मोदी पुण्यात येऊन मेट्रोचं उद्घाटन करत आहेत. महिन्याभरापूर्वी मेट्रोच्या प्रमुखांनी मेट्रो दाखवायला नेलं होतं. पंतप्रधान ज्या मार्गाने जाणार आहेत, त्या रस्त्याने मी देखील गेलो आहे. यावेळी आमच्यासोबत आमचे काही सहकारी होते. मेट्रोलचं काम अद्यापही अपूर्णच आहे. काम अर्धवट असताना उद्घाटन होत आहे. माझी त्याबद्दल काही तक्रार नाही, असं पवार म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Mahayuti Manifesto : महायुतीचा वचननामा जाहीर; मराठी माणसाला मुंबईतच घर ते बेस्ट प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत अन् बरंच काही...

Pune News: मांढरदेवीच्या यात्रेला अभूतपूर्व गर्दी; भोर मार्गावर दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा, दाेन्ही बाजुला वाहतूक जाम!

Ankita Bhandari Murder : काय आहे अंकिता भंडारी खून प्रकरण? मुख्यमंत्र्यांनी दिले CBI चौकशीचे आदेश; जुन्या जखमा आणि नवा वाद!

Rhino Attacks Tiger : वाघाच्या जबड्यातून पिल्लाची सुटका! दुधवा जंगलात गेंड्याच्या मादीचा वाघावर थरारक हल्ला; दुर्मिळ दृश्य video viral!

Black Saree Look: काळ्या साडीतला बॉलिवूड टच देईल तुम्हाला एलिगंट अन् रॉयल लूक, कौतुक नक्की मिळेल!

SCROLL FOR NEXT