Sharad Pawar, Devendra Fadnavis and Ekanth SHinde 
महाराष्ट्र बातम्या

भाजप-शिंदे गटाचं टेन्शन वाढणार! 'मूड ऑफ नेशन'च्या सर्व्हेत मविआला महाराष्ट्रात मोठं यश

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - इंडिया टुडेने सी-व्होटरच्या सहकार्याने 'मूड ऑफ द नेशन' सर्वेक्षण केले आहे. ज्यामध्ये एनडीए सरकारच्या कामकाजाबाबत देशातील लोकांची मनस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. जानेवारी 2023 मध्ये झालेल्या या सर्वेक्षणात एकूण 1 लाख 40 हजार 917 लोकांनी भाग घेतला. तसेच अनेक ज्वलंत मुद्द्यांवर आपली मते मांडली. ( BJP-Shinde group news in Marathi)

तुम्ही मोदी सरकारच्या एकूण कामगिरीवर किती समाधानी आहात, आज लोकसभा निवडणुका झाल्या तर कोणत्या पक्षाचे सरकार स्थापन होईल, तुम्हाला एनडीए सरकारचे सर्वात मोठे यश आणि अपयश काय वाटतं? असे प्रश्न विचारण्यात आले. यातून कोणत्या राज्यात एनडीएला यश मिळेल, कोणत्या राज्यात युपीए आघाडी घेईल, याचा देखील अंदाज वर्तविण्यात आला आहे.

कोणाला किती जागा?

या प्रश्नाला उत्तर देताना देशातील लोकांनी पुन्हा एनडीएचे सरकार स्थापन करण्याचे संकेत दिले आहेत. एनडीएला 298, यूपीएला 153 आणि इतरांना 92 जागा मिळण्याची शक्यता आहे. मतांच्या टक्केवारीबद्दल बोलायचे झाल्यास, एनडीएला 43, यूपीएला 29 आणि इतरांना 28 टक्के मते मिळण्याचा अंदाड आहे.

आज लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, या प्रश्नावर लोकांनी आपली मते दिली. भाजपला 284, काँग्रेसला 68 आणि इतरांना 191 जागा मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, मतांच्या टक्केवारीबद्दल बोलायचे झाल्यास, भाजपला 39 टक्के, काँग्रेसला 22 आणि इतरांना 39 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान एनडीएला कोणत्या राज्यात फायदा होईल, या प्रश्नाच्या उत्तरात आसाममध्ये 14 पैकी 12, तेलंगणात 6, पश्चिम बंगालमध्ये एकूण 42 पैकी 20 जागा मिळू शकतात. तर यूपीमध्ये एकूण 80 पैकी 70 जागा मिळू शकतात.

यूपीएला कोणत्या राज्यात लाभ होईल, या प्रश्नावर कर्नाटकात यूपीएला 17 जागा मिळू शकतात. महाराष्ट्रातही मोठे यश मिळताना दिसत आहे. महाराष्ट्रात युपीएले 34 जागा मिळू शकतात. तर बिहारमध्येही युपीएला मोठं यश मिळण्याचा अंदाज आहे. बिहारमध्ये युपीएला 25 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

राज्यात शिवसेना एक भाजपसोबत गेला आहे. तसेच १२ खासदारही या गटात सामील झाले आहे. तर उद्धव ठाकरेंचा गट महाविकास आघाडीत आहे. त्याचवेळी भाजपने राज्यात मिशन ४५ चा नारा दिला आहे. मात्र मूड ऑफ नेशनच्या सर्व्हेत युपीए अर्थात महाविकास आघाडीला ३४ जागा दाखवण्यात आल्या आहेत. अर्थात भाजप आणि शिंदे गटाच्या जागा कमी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे सहाजिकच भाजप आणि शिंदे गटाचं टेन्शन वाढणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला लवकरात लवकर खेळवा, तो... रवी शास्त्री स्पष्ट इशारा; गावसकरांनी केलं मोठं भाष्य

Navi Mumbai News : पावसाच्या पाण्यात उतरला विद्युतप्रवाह, शॉक लागताच २ विद्यार्थीनी रस्त्यातच पडल्या; महापौर आणि MSEBचे एकमेकांकडे बोट

Fifa World Cup : हॅरी केनचा दुहेरी गोलांचा धमाका; इंग्लंडचा काँगोवर २-१ असा दमदार विजय

World Sports Journalists Day 2026: 2 जुलैलाच का साजरा केला जातो जागतिक 'क्रीडा पत्रकार दिन'? जाणून घ्या इतिहास

'बाल्कनीतून खाली उडी...' मंदार जाधवने सांगितला डिप्रेशनमधला थरकाप उडवणारा प्रसंग, म्हणाला 'काम नव्हतं म्हणून...'

SCROLL FOR NEXT