marathi news central minister anant geete bjp
marathi news central minister anant geete bjp  
महाराष्ट्र

राष्ट्रवादीची विखारी टीका, पण अनंत गितेंना भाजपाने दिली साथ

रश्मी पुराणिक

मुंबई: "अनंत गितेंनी (Anant geete) उल्लेख केला तो खरा आहे. शिवसेनेच्या आमदारांना (Shivsena mla) निधी देण्याबाबत अर्थमंत्री दुजाभाव करतात. म्हणून अनंत गिते बोलले शरद पवार (Sharad pawar) आमचे नेते होऊ शकत नाहीत" असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (praveen darekar) म्हणाले. "गिते यांनी पाठीत खंजीर खुपसण्याचे वक्तव्य केले. हे राज्याचे सरकार बनवत असताना, कोणी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला?. सरकार मध्ये काय चालले हे सांगायला ज्योतिषी गरज नाही" असे दरेकर म्हणाले.

"सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, अशी अनंत गितेची अवस्था आहे. ते अडगळीत गेलेत, त्यांना काही स्थान उरलेलं नाही. त्यांचं वय झालय" अशी टीका गितेंवर केली. या टीकेनंतर राष्ट्रवादी, सुनिल तटकरे यांच्याबद्दल निषेधाचं एकही वक्तव्य येत नाही. या पक्षप्रमुखांच्या सूचना आहेत का? असा सवाल दरेकरांनी उपस्थित केला आहे.

"खरंतर शिवसेनेच्या स्थापनेत, बाळासाहेबांबरोबर अनंत गितेंनी अहोरात्र परिश्रम घेतले. कोकणातला कुणबी समाज त्यांच्या नेतृत्वाखाली एकटवला" अशा शब्दात दरेकरांनी अनंत गितेंचे कौतुक केले. "ते सहा ते सात वेळा खासदार होते. केंद्रात मंत्री होते. एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. चारित्र्य संपन्न राज्यातल्या काही मूठभर लोकांमध्ये अनंत गिते मोडतात" असे दरेकर म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT