Jagdamba Talwar in London esakal
महाराष्ट्र बातम्या

CM Eknath Shinde: ब्रिटनच्या संग्रहालयातील 'जगदंबा तलवार' महाराष्ट्रात आणणार; उच्चायुक्तांच्या भेटीनंतर CM शिंदेंची ग्वाही

CM Eknath Shinde on Jagdamba Talwar: ब्रिटनचे उप उच्चायुक्त हरजिंदर कांग यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

सकाळ डिजिटल टीम

Jagdamba Talwar : महाराष्ट्रात पर्यावरण, कृषी, पायाभूत सुविधा, आरोग्य, पर्यटन, शिक्षण, आर्टीफिशिअल इंटेलिजन्स आदी क्षेत्रात गुंतवणुकीला मोठा वाव आहे. शिवाय, परकीय गुंतवणुकीत (Foreign Investment) महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असल्याचं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) व्यक्त केलं.

ब्रिटनचे उप उच्चायुक्त हरजिंदर कांग यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यादरम्यान त्यांनी संवाद साधला. वर्षा निवासस्थानी कांग यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. शिष्टमंडळामध्ये जॉन निकेल, सचिन निकारगे यांचा समावेश होता.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, गेल्या अनेक दशकांपासून महाराष्ट्र आणि ब्रिटन दोघांमध्ये वाणिज्यिक संबंध आहेत. ब्रिटन हा भारतातील मोठा गुंतवणूकदार असून त्यातील अनेक कंपन्या महाराष्ट्रात आहेत.

गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सर्वाधिक प्राधान्यक्रम असलेले राज्य आहे. पर्यावरण, उत्पादन, शेती, पायाभूत सुविधा, आरोग्यसेवा, अक्षय ऊर्जा, जैवतंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, पर्यटन, औषधनिर्माण आणि शिक्षण या क्षेत्रात गुंतवणुकीच्या संधी आहेत.

ब्रिटनकडं या सर्व क्षेत्रात जागतिक दर्जाचे प्रगत तंत्रज्ञान आहे. महाराष्ट्रात रस्ते, उत्तम पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ आहे. भारताच्या जीडीपीमध्ये राज्याचे सर्वात मोठे योगदान असून आणि थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

British Harjinder Kang met CM Eknath Shinde

महाराष्ट्रात शिवराज्याभिषेक दिनाचा ३५० वे वर्ष सोहळा साजरा करण्यात येत आहे. ब्रिटनमधील वस्तुसंग्रहालयात असणारी जगदंबा तलवार आणि वाघनखे महाराष्ट्रात आणण्यासंदर्भात सांस्कृतिक कार्य विभाग पाठपुरावा करीत आहे.

त्याबाबत सहकार्य करण्याचं आवाहनही यावेळी करण्यात आलं. यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह आदी अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

'प्रेमाची गोष्ट'च्या पाठोपाठ छोट्या पडद्यावरील आणखी एक मालिका घेणार निरोप; कलाकारांनी शेअर केली भावुक पोस्ट

High BP Causes: 'या' 3 दैनंदिन सवयी बनतात उच्च रक्तदाबाचं मुख्य कारण! आजच बदल करा

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

SCROLL FOR NEXT