Buldhana Bus Accident Sakal
महाराष्ट्र बातम्या

Buldhana Bus Accident : 'त्यानं' जर आईच ऐकलं असतं तर कदाचित, तो आज जिवंत असता..

खासगी बसच्या भीषण अपघातामध्ये 25 जणांचा मृत्यू झाला.

सकाळ डिजिटल टीम

आईने घेतलेल्या श्रमामुळे यश साधले आता तिला सुख द्यायचे असे म्हणून निघालेल्या प्रथमेशवर काळाने घाला घातला.

वर्धा : गेल्या काही दिवसांपासून अपघातांचा हॉटस्पॉट ठरत असलेल्या समृद्धी महामार्गावर शनिवारी रात्री खासगी बसच्या भीषण अपघातामध्ये 25 जणांचा मृत्यू झाला. ही बस महामार्गावरील कठड्याला धडकली.

त्यानंतर ही बस दरवाजाच्या बाजूने आडवी पडली. यानंतर बसने पेट घेतला. मात्र, बसच्या दरवाजाची बाजू खाली असल्याने आणि प्रवाशी झोपेत असल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही. त्यामुळे 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला.

दरम्यान, पुण्याच्या प्रवासाकरिता घरून ट्रॅव्हल्स स्टॅण्डकडे निघालेल्या प्रथमेश खोडेच्या मोबाइलचे ब्ल्यूटूथ हेडफोन घरीच राहिले होते. ते आणण्यासाठी तो परत घरी गेला. यावेळी त्याच्या आईने त्याला ट्रॅव्हल्स गेली असेल कशाला जातो, असे म्हणून रोखण्याचा प्रयत्न केला.

मात्र, त्याने नकार देत परत धावपळ करीत ट्रॅव्हल्स गाठली. जर त्याने आईच ऐकले असते तर कदाचित तो आज जिवंत असता असे परिसरातील काहींकडून सांगण्यात आले. येथील बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयातून बीटेकचे शिक्षण घेऊन पुढचे उच्च शिक्षण आणि नोकरीच्या शोधात प्रथमेश पुण्याला निघाला होता. विशेष म्हणजे पुण्याला जाण्याची त्याची पहिलीच वेळ असल्याचे त्याचे मित्रांकडून सांगण्यात आले.

होतकरू मुलगा म्हणून ओळख असलेला सर्वसाधारण घरातील प्रथमेश आपल्या आईसोबत राहत होता. आपल्या अभ्यासाच्या जोरावर त्याने बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळविला. तो उत्तम हॅण्डबॉलपटू आणि चित्रकार असल्याचे मित्र सांगत आहेत. बीटेकचे शिक्षण करून त्याने पुण्यात नोकरी करून काही अभ्यासक्रमाचे क्लासेस करण्यासाठी पुण्याला मामाकडे जाण्याचे ठरवले. आईने घेतलेल्या श्रमामुळे यश साधले आता तिला सुख द्यायचे असे म्हणून निघालेल्या प्रथमेशवर काळाने घाला घातला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भेसळयुक्त तूप तयार करणाऱ्या आणि त्याचे पॅकेजिंग करणाऱ्या एका संशयास्पद युनिटवर छापा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

Video: संपूर्ण 'वंदे मातरम्' गायनावर सोनिया गांधींनी खरंच आक्षेप घेतला होता का? नेमकं काय घडलं? काँग्रेसचं स्पष्टीकरण

महिलांविषयीचा 'तो' प्रश्न आणि स्पर्धकाने खेळ सोडला; बरोबर उत्तराने मिळाले असते ५० लाख; तुम्हाला येतंय का उत्तर?

SCROLL FOR NEXT