samruddhi mahamarg bus accident esakal
महाराष्ट्र बातम्या

मन हेलावून टाकणारी घटना! बस अपघातात 25 लोक जिवंत जळाले, 'दुभाजक' ठरलं दुर्घटनेचं कारण

बुलढाण्यातून अपघाताची एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आलीये.

सकाळ डिजिटल टीम

बस सर्वात आधी नागपूरवरून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर उजवीकडे एका लोखंडी पोलला धडकली.

Buldhana News : बुलढाण्यातून अपघाताची एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आलीये. बसमध्ये आग लागल्याने 25 प्रवासी जिवंत जळाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही बस एका लग्नासाठी जात होती. तेव्हाच पावसामुळं बस रस्त्यावरुन घसरली.

या घटनेत बसचा डिझेल टँक फुटला आणि बसला आग लागली. या दुर्घटनेत बसमधील 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झालाय. या बसमध्ये नागपूर, वर्धा आणि यवतमाळचे प्रवासी होते. ही बस विदर्भ ट्रॅव्हल्सची होती. ही बस सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावालगत समृध्दी महामार्गावर रस्ता दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर बसने पेट घेतला.

25 प्रवाशांचा जागीच मृत्यू

डिझेलच्या संपर्कात आल्याने बसने वेगाने पेट घेतला. यात 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. ही बस पहिल्यांदा लोखंडी पोलला धडकली. त्यानंतर ही बस रस्ता दुभाजकाला धडकली. त्यानंतर बस पलटी झाली. बसचा दरवाजा गाडीखाली आल्यानं कोणालाच बाहेर येता आलं नाही.

बस दुभाजकाला धडकली

दरम्यान, वाचलेले प्रवासी गाडीच्या काचा फोडून बाहेर आले. बस दुभाजकाला धडकली त्यावेळी समोरचा एक्सेल तुटला होता. समोरची चाक बस पासून वेगळी झाली होती. त्यानंतर आग लागली. या घटनेत 25 जणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर काही प्रवाशांनी काचा फोडून बाहेर येण्याचा प्रयत्न केला.

बसमधील काही तरुणांनी फोडल्या काचा

काचा फोडून बाहेर आलेल्या प्रवाशांचा जीव वाचला आहे. बस अपघातग्रस्त झाल्यानंतर बसमधील काही तरुणांनी काचा फोडल्या आणि ते बाहेर आले. त्यांनी काही प्रवाशांना बाहेर काढले. हा अपघात १.२६ मिनिटांनी अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

लोकांना बाहेर पडण्यासाठी नव्हता मार्ग

बस सर्वात आधी नागपूरवरून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर उजवीकडे एका लोखंडी पोलला धडकली. अनियंत्रित होऊन पुढं जाऊन येणाऱ्या आणि जाणाऱ्या दोन्ही लेनच्या मध्ये असलेल्या काँक्रिटच्या दुभाजकाला धडकली आणि पलटली. बस पलटी होताना डाव्या बाजूने पलटली. त्यामुळं बसचे दार खाली दाबले गेले. त्यामुळं लोकांना बाहेर पडण्यासाठी मार्ग नव्हता. त्यामुळे अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला. बसमधून 25 मृतदेह पोलिसांनी बाहेर काढले आहेत. मात्र, त्यांची ओळख पटवणे अडचणीचे होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT