Gautami Patil SAKAL
महाराष्ट्र बातम्या

Gautami Patil: गौतमी पाटीलचा कार्यक्रम पडला चांगलाच महागात! सोलापुरात आयोजकावर गुन्हा दाखल

सोलापूरात गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करणं एका आयोजकांना चांगलच महागात पडलं

अंकिता खाणे (Ankita Khane)

'सबसे कातील गौतमी पाटील' रोजच चर्चेत असते. गौतमीने फार कमी वेळेत प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. सध्या प्रत्येक गावागावात गौतमीचा कार्यक्रम होताना दिसुन येत आहे. गौतमी आपल्या गावात येणार म्हटल्यावर कार्यक्रमाची जय्यद तयारी सुरू होते. अगदी लहान मुलांपासून ते वृध्दांपर्यंत सर्वांच्या अंगात उत्साह संचारतो.परंतु सोलापूरात गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करणं एका आयोजकांना चांगलच महागात पडल्याचं दिसुन येत आहे. (Latest Gutami News)

कोणतीही शासकीय कार्यालयाची परवानगी घेतली नाही, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो तसेच लेखी कळवूनही लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील हिचा सांस्कृतिक लावणी कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आयोजकावर बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

राजेंद्र भगवान गायकवाड (महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष, प्रजाशक्ती पार्टी, रा. आगळगाव रोड) असे गुन्हा दाखल झालेल्या आयोजकाचे नाव आहे. पोलिस अमोल वाडकर यांनी फिर्याद दाखल केली. ही घटना शुक्रवारी (ता. १२) रात्री दहाच्या दरम्यान घडली.

गायकवाड याने बार्शी शहर पोलिस ठाण्यास ६ मे रोजी व पोलिस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांना ९ मे रोजी १२ मे रोजी लावणी सम्राज्ञी गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करीत असून, सशुल्क पोलिस बंदोबस्त मिळावा, यासाठी अर्ज केला होता.

कार्यक्रमावेळी अनुचित प्रकार घडू नये, महावितरण वीजपुरवठा मंजुरी प्रमाणपत्र, अचानक वीजपुरवठा खंडित झाल्यास अनुचित प्रकार घडू नये यासाठी वितरणचे कर्मचारी नेमणूक केल्याबाबतचे प्रमाणपत्र, आपत्कालीन अग्निशामक यंत्रणा प्रमाणपत्र, अॅम्ब्युलन्स व वैद्यकीय यंत्रणा उपलब्ध प्रमाणपत्र याची पूर्तता करावी व नंतर पोलिस बंदोबस्त शुल्क भरल्यानंतर कार्यक्रमास परवानगी व सशुल्क बंदोबस्त देण्यात येईल, असे लेखी १२ मे रोजी गायकवाड यास कळवले होते. तरीही कोणतीही शासकीय परवानगी घेतली नाही व कार्यक्रम आयोजित केला म्हणून गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार सचिन कदम तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

SCROLL FOR NEXT