rajesh tope rajesh tope
महाराष्ट्र बातम्या

म्युकरमायकोसिसची इंजेक्शन्स केंद्रानं त्वरीत उपलब्ध करावीत - टोपे

राज्यात सध्या म्युकर मायकोसिसच्या रुग्णांची संख्या मोठी असून इंजेक्शनचा तुटवडा आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्यात म्युकरमायकोसिस आजाराची प्रकरणं वाढत असून यावर उपचारांसाठी आवश्यक असलेलं इंजेक्शन अॅम्फोटेरेसिन बी (Amphotericin B) चा राज्यात तुटवडा आहे. या इंजेक्शनवर सध्या केंद्र सरकारचं नियंत्रण असल्यानं त्यांनी लवकरात लवकर महाराष्ट्रासाठी ते उपलब्ध करुन द्यावं, अशी मागणी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. (Center should provide injections on mucormycosis immediately demanded Rajesh Tope)

टोपे म्हणाले, "म्युकरमायकोसिस म्हणजेच काळी बुरशी या आजाराचे राज्यात अंदाजे १,५०० रुग्ण आढळून आले आहेत. यांपैकी ५०० रुग्ण बरे होऊन गेलेत तर सध्या साधारण ८०० ते ८५० रुग्ण रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. यामध्ये उपचारांसाठी लागणारे अॅम्फोटेरेसिन बी हे इंजेक्शन गरजेचं आहे. रुग्णाच्या आजाराच्या तीव्रतेनुसार दररोज सहा याप्रमाणं एकूण ६० ते १०० इंजेक्शन्स रुग्णाला दिली जातात. राज्यानं सध्या १ लाख ९० हजार अॅम्फोटेरेसिन बी इंजेक्शनची ऑर्डर दिली आहे. पण ज्या फार्मा कंपन्या हे इंजेक्शन बनवतात ते सध्या याचा पुरवठा करत नाहीएत. कारण याच्या पुरवठ्यावर पूर्णपणे केंद्र सरकारचं नियंत्रण आहे. त्यामुळे राज्यात या आजाराच्या रुग्णांची संख्या अधिक असल्यानं केंद्रानं लवकरात लवकर राज्याला उपलब्ध करुन देण्याची परवानगी द्यावी. कारण रुग्णाला हे इंजेक्शन वेळेत मिळणं गरजेचं आहे. राज्याला आत्तापर्यत अॅम्फोटेरेसिन बी ची १६ हजार इंजेक्शन्स मिळाली आहेत. ही इंजेक्शन्स विविध जिल्ह्यांमधील रुग्णांच्या संख्येप्रमाणं वाटप करण्यात आलं आहे, पण आता तेही पुरेस नाहीए."

डॉक्टरांसाठी ९ पानांची गाईडलाईन्स

म्युकरमायकोसिस आजारासाठी राज्यातील डॉक्टरांना आपण ९ पानांची गाईडलाईन्स दिली आहेत, अशी माहिती यावेळी राजेश टोपे यांनी दिली. या आजाराबाबत सर्वांनी माहिती व्हावी यासाठी या गाईडलान्स देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून होणार उपचार

म्युकरमायकोसिस या आजारावर आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार होणार आहेत. यासाठी रुग्णाकडं कोणतंही रेशनकार्ड (पिवळं, केशरी, पांढरं) असेल तरी उपचार होणार आहेत. या योजनेंतर्गत जी हजारो रुग्णालये आहेत त्या सर्व रुग्णालयांध्ये या आजारासाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत तिथे त्यांच्यावर उपचार होणार आहेत. तसेच सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये यावर उपचार होणार असल्याचंही यावेळी आरोग्यमंत्री टोपे यांनी स्पष्ट केलं.

पैसे नाहीत म्हणून रुग्णांनी भीती बाळगू नये - टोपे

महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून दीड लाख रुपयांचा खर्च प्रत्येक लाभार्थी कुटुंबाला मिळतो. त्यामुळं महाविकास आघाडी सरकारनं जाणीवपूर्वक म्युकरमायकोसिस आजारावरील सर्व खर्चाची व्यवस्था या योजनेतून केली आहे. विमा कंपनीतून या आजारावरील खर्च मिळेल त्यानंतर वरचा खर्च महात्मा फुले ट्रस्टमधून मिळेल. या योजतेनतू इंजेक्शनही मोफत मिळणार आहेत. त्यामुळे पैसे नाहीत म्हणून रुग्णांनी भीती बाळगू नये, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagarpalika Election Date: या तारखेला नगरपालिकेची झुंज! स्थानिक स्वराज्यच्या पहिल्या टप्प्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, Time Table बघा अन् लागा तयारीला...

Duplicate Voters List : दुबार मतदाराच्या नावापुढे डबल स्टार, नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी आयोगाने उचलले मोठे पाऊल, कशी घेणार दक्षता ?

Latest Marathi News Live Update : शेतकरी व्यापाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी

'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत होणार 'या' अभिनेत्याची एंट्री; प्रोमो पाहिल्यावर प्रेक्षकांनीच सांगितलं नाव

Ganesh Naik : १५०० बिबट वनतारामध्ये स्थलांतरित व १००० पिंजरे खरेदीसाठी १० कोटी रुपये निधी मंजूर करण्याचा निर्णय

SCROLL FOR NEXT