Chandrakant Patil
Chandrakant Patil esakal
महाराष्ट्र

'भाजपच्या जिवावर 18 खासदार निवडून आलेत, हे विसरू नका'

किरण बोळे

'ममता बॅनर्जीही पंतप्रधान होऊ पाहात आहेत, तर शरद पवारांचं नाव कायमच पंतप्रधान म्हणून समोर येत असतं.'

फलटण शहर (सातारा) : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासारखा पंतप्रधान पुन्हा होणे शक्य नाही. कोविड काळात केंद्र शासनाने परिस्थिती सक्षमपणे पेलली; परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गेली दोन वर्षे मंत्रालयातच गेले नाहीत. ते पंतप्रधान होण्याची भाषा केली जाते. ममता बॅनर्जीही (Mamata Banerjee) पंतप्रधान होऊ पाहात आहेत, तर शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव कायमच पंतप्रधान म्हणून समोर येत असते. आगामी काळातही भारतीय जनता पक्षच सत्तेत राहील, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी व्यक्त केला. दरम्यान आगामी निवडणुकीत फलटण नगरपालिकेवरही (Phaltan Municipality) भाजपचा (BJP) झेंडा फडकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

येथे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsingh Naik Nimbalkar) यांनी सुरू केलेल्या भारतीय जनता पक्षाच्या (Bharatiya Janata Party) संपर्क कार्यालयाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे (Jayakumar Gore), आमदार समाधान आवताडे, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख आदी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांचा, समस्यांचा अगदी बारकाईने विचार केला आहे. त्यांच्यासाठी त्यांनी विविध प्रकारच्या योजना आणून त्यांची यशस्वीपणे अंमलबजावणीही केली असल्याचे स्पष्ट करून श्री. पाटील म्हणाले, ‘‘विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी राज्यभरात जेवढे फिरतात. त्याच्या एक टक्काही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फिरत नाहीत. गेल्या दोन वर्षांत मंत्रालयातही गेले नाहीत आणि ते पंतप्रधान होणार हे सांगणाऱ्यांनी भाजपच्या जिवावर आपले १८ खासदार निवडून आले आहेत. हे विसरू नये.’’

खासदार निंबाळकर यांनी आपल्या कार्याचा धडाका लावला आहे. त्यांचा फलटणमध्ये भव्य दिव्य सत्कार व्हावा, अशी संधी मी शोधत आहे. ती संधी आपणास लवकरात लवकर मिळो, अशी प्रार्थना आपण विठूरायाकडे करीत असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात फलटण तालुक्यात सर्वत्र भाजपचीच सत्ता असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे बेरोजगार सेलचे प्रदेश सचिव प्रसाद पवार-पाटील, बांधकाम व्यावसायिक सागर शहा, भटक्या विमुक्त जाती जमातीचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल शिंदे, सामाजिक कार्यकर्ते जमिल आतार आदींनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.

...तर अनुप शहा भावी नगराध्यक्ष : पाटील

फलटण नगरपालिकेवर खासदार निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सत्तांतर होईल. त्या वेळी नगरसेवक, विरोधी पक्ष नेते असा प्रवास केलेले आमचे अनुप शहा हे नगराध्यक्ष नक्कीच होतील, अशी खात्री पाटील यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला बसला दुसरा धक्का, कर्णधार केएल राहुलला हर्षित राणाने धाडलं माघारी

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT