Sanjay Raut News e sakal
महाराष्ट्र बातम्या

चंद्रकांतदादांनी चोंबडेपणा करू नये: संजय राऊत

चंद्रकांत दादांनी चोंबडेपणा करू नये, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसांपासून राज्यसभा उमेदवारीवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यादरम्यान काल संभाजीराजे छत्रपतींनी राज्यसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केलं होतं. त्यानंतर भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिवसेनेवर टिका केली होती. यावर उत्तर देताना आज शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर टीका केली आहे. चंद्रकांतदादांनी चोंबडेपणा करू नये, हा शिवसेना आणि संभाजीराजे छत्रपतींचा (Sambhajiraje Chhatrapati) अंतर्गत विषय आहे, असं संजय राऊत म्हणाले.

कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते, त्यांना सर्वपक्षीयांनी साथ द्यावी, अशी त्यांची इच्छा होती. मात्र त्यांनी शिवसेनेतूनच राज्यसभेवर जावं, याबाबत शिवसेना ठाम होती. या घडामोडींदरम्यान शिवसेनेनं संजय पवार हे आपले राज्यसभेचे उमेदवार असतील, हे जाहीर केलं. त्यानंतर काल संभाजीराजे छत्रपतींनी पत्रकार परिषद घेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला नाही असं म्हणत राज्यसभा निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं. त्यानंतर भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली होती. 'मुख्यमंत्र्यांना शिवरायांच्या पुतळ्यासमोर उभं करून खरंखोटं करावं' असं म्हटलं होतं. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांना पत्रकारांनी विचारले असता, त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर तिखट शब्दात टिका केली.

संजय राऊत म्हणाले, "प्रत्येक राजघराण्याचे काही राजकीय लागेबांधे आहेत, हे संबंधच घेऊन पुढं जावं लागतं. इथे व्यक्तिगत काहीच नसतं. चंद्रकांत दादा कोण? ते वंशज आहेत का शिवाजी महाराजांचे? ते कोण ठरवणारे? त्यांनी 2019 साली शब्द कोणी मोडला ते आधी सांगावं.:"

"शब्द मोडण्याची परंपरा कोणाची आहे, हे 2019 ला सर्वांनी पाहिलंय. हा विषय छत्रपती संभाजी आणि शिवसेनेतील आहे, इतरांनी चोंबडेपणा करू नये, आमचं आम्ही बघून घेऊ" असा टोला संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sainik Takli Protest : आमदार यड्रावकरांच्या समर्थकांकडून सैनिक टाकळीच्या आंदोलकांना मारहाण?, शिरोळ तालुका बंदची हाक; तिरंग्याच्या काठीने मारल्याला आरोप

Panvel-Karjat Railway Line: कर्जतहून नवी मुंबई आता आणखी जवळ! नवा रेल्वेमार्ग लवकरच खुला होणार; किती टक्के काम पूर्ण?

Koyna Dam: कोयना धरणाच्या दरवाजातून होणार विसर्ग पुर्णपणे बंद; धरणात सध्या 93.02 टीएमसी पाणीसाठा

Yavatmal Politics: जमिनीवर बसले, काळा चहा घेतला, झुनका-भाकरी खाल्ली; पालकमंत्री संजय राठोडांचा आदिवासी बांधवांसोबत दिवस

Religious Travel: ६ महिने स्केटिंग, ३ महिने सायकलिंग! श्रद्धेला जिद्दीची साथ; बाराही ज्योतिर्लिंगांसाठी निघालेल्या दोन तरुणांची अनोखी कहाणी

SCROLL FOR NEXT