Chandrakant Patil , Raju Shetti  Esakal
महाराष्ट्र बातम्या

चंद्रकांत पाटलांची राजू शेट्टींना ऑफर

सध्या कोणतीही राजकीय भूमिका घेण्याच्या मनस्थित नाही -राजू शेट्टी

सकाळ डिजिटल टीम

संघटनेमध्ये महाविकास आघाडीबद्दल (Maha Vikas Aghadi)नाराजी, असंतोष आहे. याचा अर्थ केंद्र सरकारवर खूष आहे असा नाही. काहीही राजकीय निर्णय घ्यायचा असेल तर पाच तारखेच्या कार्यकारणीमध्ये घेवू असे राजू शेट्टी (Raju shetti) यांनी घोषित करताचा भाजप प्रदेशाध्याक्ष चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांनी राजू शेट्टी यांना आॅफर दिली आहे.

गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे शेतकऱ्यांची तसेच स्वाभिमानीची मानसिकता खचली आहे. सत्तेत राहून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसतील तर अशी सत्ता नकोच असे राजू शेट्टी यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. राज्यसरकारमध्ये राहायच का नाही याचा निर्णय पाच तारखेला घेऊ तोपर्यंत आमचे पत्ते आम्ही ओपन करणार नाही. सध्या कोणतीही राजकीय भूमिका घेण्याच्या मनस्थित नाही असेही शेट्टींनी सांगितले.

गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे शेतकऱ्यांची तसेच स्वाभिमानीची मानसिकता खचली आहे.

राजू शेट्टींच्या या भूमिकेवर चंद्रकांतदादांनी आॅफर दिली आहे. ते म्हणाले, भाजपातील काही ध्येयधोरणे त्यांना पटली नाहीत म्हणून राजू शेट्टीनी भाजपा सोडली. जरी तुम्हाला काही ध्येयधोरणे पटली नाही तरी देशाचे पंतप्रधान ज्यांनी सर्वसामान्य जनतेच्या मनात घर केले आहे त्यांच्यावर तुम्ही टीका करू नका अशी वारंवार विनंती याआधी त्यांना केली. परंतु आमची त्यांनी साथ सोडली. महाविकास आघाडीत गेल्यावर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, कर्जमाफी,अनुदान नाही, विजेच्या जोडण्या कट करतात,एफआरपीचे तुकडे करतात हे त्यांच्या आता लक्षात आले आहे. त्यांनी जर महाविकास आघाडी सोडली आणि भाजपमध्ये येण्याची तयारी दर्शवली तर आम्ही त्यांचे नक्की स्वागत करू असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT