Chandrakant Patil Sakal
महाराष्ट्र बातम्या

व्यवस्थेवर प्रश्न करणाऱ्या मविआ नेत्यांपैकी मी नाही; चंद्रकांत पाटलांचा टोला

"तिसरी जागा लढण्याची केंद्राने आम्हाला परवानगी दिली तर ती जागा आम्ही जिंकूच" असा विश्वास त्यांनी दाखवला आहे.

दत्ता लवांडे

मुंबई : शिवसेनेचे अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानावर ईडीने आज कारवाई केली आहे. त्यांच्या संबंधित सात ठिकाणी ईडीने छापा टाकत कारवाई केली आहे. त्यांच्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दरम्यान शिवसेनेचे संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली होती.

(BJP Chandrakant Patil On Anil Parab ED Raid)

सगळ्या कारवाई कोर्टामध्ये टिकल्या मग त्यांनी केलेल्या आरोपामुळे त्यांचा कोर्टावर विश्वास नाही का असा प्रश्न उपस्थित होतो असं चंद्रकांत पाटील बोलताना म्हणाले आहेत. "आम्ही केलेले सगळे आरोप कोर्टात टिकले पण त्यांच्यावर कारवाई झाली तर ते त्यांच्यावर सुडबुद्धीने कारवाई केल्याचे आरोप करतात. तुमच्याकडे पुरावे असतील तर तुम्हालाही कोर्टाचे दार उघडे आहे." असं ते म्हणाले. "सुप्रिया सुळेच नाहीतर आम्ही प्रत्येक महिलांना आदर देतो." असं ते सदानंद सुळे यांच्या टीकेवर बोलताना म्हणाले आहेत.

"ज्या ओबीसी समाजाच्या प्रेमापोटी मी हा संताप व्यक्त केला होता, त्या ओबीसी समाजाला मी सात्विक संताप व्यक्त केल्याबद्दल आनंद झाला, जमत नसेल तर घरी जा." असं ते आपल्या टीकाकारांना म्हणाले आहेत. कालचक्र फिरत असतं, त्यामुळे कोण कोणाला मसणात पाठवेल ते निवडणुकांत कळेल. दोन उमेदवार लढवण्याच्या प्रयत्नात कधीकधी मूळ उमेदवार पडतो हेही राऊत यांनी लक्षात ठेवावं." असा टोला त्यांनी शिवसेनेला लावला आहे. दरम्यान "तिसरी जागा लढण्याची केंद्राने आम्हाला परवानगी दिली तर ती जागा आम्ही जिंकूच" असा विश्वास त्यांनी दाखवला आहे.

"मी महाविकासआघाडीचा नेता नाही ज्याने व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले, आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर चाललेल्या व्यवस्थेवर अविश्वास दाखवणाऱ्या मविआच्या नेत्यांपैकी मी नाही, त्यामुळे मी त्या नेत्यांविषयी बोलणार नाही." असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amazon Prime Day Sale: आला रे आला अमेझॉनचा ‘प्राइम डे सेल’ आला; मध्यरात्रीच सुरू होतोय धडका, मोठी संधी चुकवू नका!

Shambhuraj Desai : मंत्री शंभुराज देसाईंचे थेट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनाच आव्हान... म्हणाले,

Latest Marathi News Updates: खडकवासला धरण परिसरात प्रेमी युगलाने दिला जीव

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहच्या ५ विकेट्सने दिले हादरे! कपिल देवसह अनेकांचे विक्रम मोडले; पण इंग्लंडचे शेपूट पुन्हा वळवळले

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

SCROLL FOR NEXT