chandrakant Patil  esakal
महाराष्ट्र बातम्या

शिवसेना तुमच्यापासून अंतर का राखतेय, हिशोब लावून आम्हालाही कळवा - चंद्रकांत पाटील

संजय राऊत स्वत:ला तपास यंत्रणा आणि न्यायाधीश समजत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: शिवसेना नेते, खासदार संजय राऊत (Sanjay raut) हे पत्रकार परिषद घेऊन भाजपवर निशाणा साधत आहेत. यावर आता भाजप नेत्यांनीही कंबर कसली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे कालपासून कोल्हापुरात (Kolhapur) आहेत. त्यांनी संजय राऊत यांच्यावर आरोपाच्या फैरी झाडण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना (Shivsena) तुमच्यापासून अंतर का राखतेय याचा हिशोब लावून आम्हालाही कळवा असा निशाणा राऊतांच्यावर लगावला आहे. त्यांनी ट्विट करत घणाघात केला आहे.

तुमच्यापासून अंतर का राखतेय याचा हिशोब लावून आम्हालाही कळवा असा निशाणा राऊतांच्यावर लगावला आहे.

ते म्हणतात, विश्वप्रवक्ते संजय राऊत स्वत:ला तपास यंत्रणा आणि न्यायाधीश समजत आहेत. किरीट सोमय्यांवर (Kirit Somaiya) जे आरोप त्यांनी केलेत त्याचा तपास-हिशोबही तेच करत आहेत. सोमय्यांची धिंड काढतील असा निर्णयही लावून मोकळे झाले आहेत. तुम्ही सर्वज्ञ असाल, पण यंत्रणांना काम करण्याची जरा संधी तरी द्या? असा मिश्किल शालूजोडा हाणला आहे.

माझीही धिंड निघेल त्यामुळे बाजूला राहा, असा सल्ला देताय की ही तुमची पोकळ दमबाजी? किरीट सोमय्या यांच्या पासून किती अंतर राखावं याचा हिशोब आम्ही आमच्या पद्धतीनं करणार आहोतच, याची काळजी करू नका. मात्र आता या सगळ्यात शिवसेना तुमच्यापासून अंतर का राखते आहे, याचा हिशोब लावा आणि आम्हालाही जरा याचे उत्तर कळवा असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Heatwave: मुंबईचं तापमान ४० अंशांवर का पोहोचलं? तज्ज्ञांनी कारणच सांगितलं; मोठा खुलासा आला समोर

Horoscope News : उद्या 12 मार्चपासून 'या' 4 राशींना लाभेल नशीबाची पूर्ण साथ; अडकलेले पैसे येतील परत, अचानक मिळेल मोठी खुशखबर

IPL 2026 Schedule: परंपरेला तडा! RCB vs CSK हे आयपीएल २०२६च्या पहिल्याच सामन्यात भिडण्याचा अंदाज; जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स

Latest Marathi News Live Update : चाकण औद्योगिक वसाहतीवरती गॅसच्या तुटवड्यामुळे मोठा परिणाम, 30% कंपन्या या ठप्प होण्याच्या मार्गावर

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रस्त्यावर पार्किंगसाठी ऑड-ईवन नियम लागू; मुंबई ट्रॅफिक पोलिसांचा मोठा निर्णय, काय बदल होणार?

SCROLL FOR NEXT