Chandrasekhar Bavankule nagpur  sakal
महाराष्ट्र बातम्या

"बावनकुळे 'कंस मामा' त्यांनी आता 'रावणा'चं रुप धारण केलंये"; सख्या भाच्याची सडकून टीका: Bavankule

कोण आहेत भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे भाचे आणि त्यांनी का केलीए टीका? जाणून घ्या

Amit Ujagare (अमित उजागरे)

पंढरपूर : राज्याच्या राजकारणात काका पुतण्या, मामा भाचे अशा अनेक जोड्या प्रसिद्ध आहेत. त्यात आता आणखी एका नव्या जोडीची चर्चा सुरु आहे. ही जोडी म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांचे भाचे जयकुमार बेलाखडे हे होय.

या जोडीतील बेलाखडे यांनी बावनकुळे यांच्यावर जिव्हारी लागणारी टीका केली आहे. त्यामुळं राज्यातील राजकारणात नवा अंक पहायला मिळू शकतो. (Chandrashekhar Bavankule Kansa Mama He has now behaved like Ravana Criticism by Jaykumar Belakhade)

बावनकुळे कंस मामा, आता रावण बनलेत

जयकुमार बेलाखडे हे भारत राष्ट्र समितीचे (BRS) नेते आहेत. बीआरएस हा पक्ष तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा पक्ष आहे. बेलाखडे यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला असून त्यांनी नुकतेच आपल्या मतदारसंघातील ३ हजार नागरिकांना घेऊन पंढरपुरच्या विठ्ठलाचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी मीडियाशी बोलाताना आपले सख्खे मामा चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर कडवी टीका केली.

"चंद्रशेखर बावनकुळे म्हणजे कंस मामा आहेत, सध्या त्यांनी रावणाचं रुप घेतलं आहे. भाजपच्या १०८ माळेच्या मण्यांमधील ते एक मणी आहेत. आमच्या मामाला काही कळत नाही," अशा शब्दांत जाहिररीत्या जयकुमार बेलाखडे यांनी टीका केली आहे. त्याचबरोबर बेलाखडे यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवरही टीका केली आहे.

शिंदे सरकार म्हणजे ५० खोकेवाल्या गारुड्यांचं सरकार आहे, असं म्हटलं असून हे सरकार जाऊन लवकरच शेतकऱ्यांचं बीआरएसचं सरकार सत्तेत येईल असं त्यांनी म्हटलं आहे.

फडणवीसांना देणार आव्हान

बेलाखडे हे आधी भाजपत होते पण त्यांनी आता बीआरएसमध्ये प्रवेश केला. वर्ध्यातील आर्वी या मतदारसंघातून विधानसभा निवडणुक लढवण्यास ते इच्छुक होते, पण इथून फडणवीसांचे स्वीय सहाय्यक सुमीत वानखेडे यांना भाजपकडून तिकीट मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच बेलाखडे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

SCROLL FOR NEXT