chandrashekhar bawankule advice to uddhav thackeray 
महाराष्ट्र बातम्या

संजय राऊत यांच्या ट्रॅपमधून उद्धव ठाकरेंनी बाहेर पडावं, बावनकुळेंचा सल्ला

'उद्धव ठाकरे यांंना वस्तुस्थिती समजून घेऊन आत्मचिंतन करण्याची गरज आहे'

सकाळ डिजिटल टीम

'उद्धव ठाकरे यांंना वस्तुस्थिती समजून घेऊन आत्मचिंतन करण्याची गरज आहे'

वृत्तपत्रातील मुलाखतीच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊतांनी मुलाखत घेणे म्हणजे मॅच फिक्सिंग आहे. शिवसेना (Shivsena) वाचवायची असेल तर उद्धव ठाकरे (Uddhav Thakrey) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या ट्रॅप मधून बाहेर पडावे, असा सल्ला भाजपचे (BJP) प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी दिला आहे. तेच प्रश्न विचारणार आणि तेच उत्तर देणार ही बंद खोलीतीली मुलाखत मॅच फिक्सिंगच असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. (chandrashekhar bawankule advice to uddhav thackeray)

यावेळी बावनकुळे यांनी ओबीसी (OBC) आरक्षणावरून अजित पवार (Ajit Pawar) आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. या दोन्ही नेत्यांचा ओबीसी आरक्षणाला विरोध असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. ते म्हणाले, ठाकरे यांना मुलाखत द्यायची होती तर प्रसिद्धी माध्यमांसमोर द्यायला हवी होती. उद्धव ठाकरे यांना वस्तुस्थिती समजून घेऊन आत्मचिंतन करण्याची गरज आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ओबीसी आरक्षण मिळू नये यासाठी षडयंत्र रचले होते. ओबीसींचा डेटा संकलित करण्यासाठी निरगुडे आयोगाने ४३५ कोटी रुपयांची मागणी राज्य सरकारकडे केली. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ती मागणी फेटाळून लावली. आता सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण कायम केले असून महाविकास आघाडीचे नेते राजकीय पोळी भाजत आहेत. ओबीसी आरक्षण विरोधातील झारीतील शुक्राचार्य आहेत असंही ते म्हणालेत.

पुढे बावनकुळे यांनी मंत्री छगन भुजबळ आणि वडेट्टीवार यांच्यावर नाव न घेता टीकेची झोड उठवली आहे. ते म्हणाले, सध्या काही महाविकास आघाडीचे नेते ओबीसी समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करत आहेत. आम्हीच ओबीसी नेते आहोत. असे दाखवण्याचा काहीजण प्रयत्न करत आहेत. त्यांनी तो थांबवावा कारण जनतेला सर्व माहिती आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वारी संदर्भात बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे यांच्या दिल्ली भेटीचा राजकीय अर्थ लावू नये. राज्याच्या विकासासाठी हजार वेळा जावे लागले तरी ते जातील. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी दिखावापणा बंद करून विदर्भ वैधानिक विकास महामंडळ, मराठवाडा वैज्ञानिक विकास महामंडळ, उत्तर महाराष्ट्र वैज्ञानिक विकास महामंडळ बंद का केली, याचे उत्तर द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharia law : 'सत्तेत आल्यास देशात शरिया कायदा लागू करणार, हिंदूंसह मुस्लिमांना देणार अधिकार'; फैजुल करीम यांचं वादग्रस्त विधान

Shaktipeeth Highway : सतेज पाटील, राजू शेट्टींचे ‘शक्तिपीठ’विरोधात विठ्ठलाला साकडे

Ashadhi Wari 2025 : पुण्याहून पंढरपूरसाठी ३२५ अतिरिक्त बस, गाड्या शनिवारी, रविवारी धावणार; नियंत्रण कक्ष स्थापन

Maharashtra Education : विधान परिषदेत शिपायाच्या कंत्राटी पदावरून पेच; सत्ताधारी शिक्षक, पदवीधर आमदारांनीच केला सभात्याग

Ashadhi Ekadashi 2025: मुखात तुझे नाव, डोळ्यात तुझे गाव;डिगडोहमध्ये ‘विठ्ठल रखुमाईचा दर्शन सोहळा, माऊली ग्रुपचा उपक्रम

SCROLL FOR NEXT