Chhagan Bhujbal accusing Manoj Jarange of creating tension between OBC and Maratha communities amid reservation controversy.

 

esakal

महाराष्ट्र बातम्या

Chhagan Bhujbal accuses Manoj Jarange : ''मनोज जरांगेंमुळेच ओबसी अन् मराठा समाजात अंतर पडलं'' ; छगन भुजबळांचा जाहीर आरोप!

Chhagan Bhujbal Statement : ओबीसींच्या आरक्षणासाठी १५ जणांनी आत्महत्या केलीय, मी दिवाळीच्या शुभेच्छा कशा देऊ? असंही भुजबळ जाहीरसभेत म्हणाले आहेत.

Mayur Ratnaparkhe

Chhagan Bhujbal’s Big Allegation Against Manoj Jarange: बीडमधील ओबीसींच्या निर्धारसभेत भाषण करताना मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदारन निशाणा साधला आणि ओबीसी आरक्षणाबाबतही ठामपणे भूमिका मांडली. भाषणाच्या सुरुवातीस उपस्थितांना संबोधत भुजबळ म्हणाले, राज्यात अतिवृष्टी झालेली आहे, असं असतानाही तुम्ही सगळे ओबीसींची वज्रमूठ दाखवण्यासाठी आलात त्यासाठी तुम्हाला धन्यावाद.

यानंतर भुजबळ असंही म्हणाले, की दिवाळीच्या शुभेच्छा मी तुम्हाला कशा देऊ? ओबीसींच्या आरक्षणासाठी १५ जणांनी आत्महत्या केली आहे, आपण कशी दिवाळी साजरी करावी? तसेच, आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. जे सामाजिकदृष्ट्या मागास आहेत त्यांच्यासाठी आरक्षण आहे. असंही भुजबळ यावेळी म्हणाले.

तर मराठा आरक्षण आंदोलन करते मनोज जरांगे यांच्यावर आरोप करत भुजबळ म्हणाले, मराठा समाजाला आमचा विरोध नाही. मात्र  मराठा समजात आणि आमच्यात जरांगेंमुळे अंतर पडलंय. या निर्धारसभेस धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर, लक्ष्मण हाके, मनोहर धोंडे, लक्ष्मणराव गायकवाड आदींचीही उपस्थिती होती.

याशिवाय, ज्यांनी ज्यांनी तुमच्याविरोधात भूमिका घेतली, त्यांना डोक्यात ठेवा आणि येत्या निवडणुकीत त्यांना पाडा, असं आवाहनही भुजबळ यांनी ओबीसी समाजाला केलं आहे. तसेच, आरक्षणासाठी आम्ही दुहेरी लढाई लढणार आहोत, एक तर न्यायालयीन आणि दुसरी तर रस्ता तर आमच्याच बापाचा आहे, असंही भुजबळ यांनी यावेळी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohammad Shami ने पहिल्याच रणजी सामन्यात घेतल्या ७ विकेट्स अन् मग अजित आगरकरला दिलं उत्तर; म्हणाला, 'त्यांना काय म्हणायचं ते...'

Banke Bihari Temple Treasure Open: तब्बल पाच दशकांपेक्षाही अधिक काळानंतर उघडला ''भगवान बांके बिहारी''चा रहस्यमयी खजाना!

Latest Marathi News Live Update : वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली, हजारो लिटर पाणी वाया

रांगोळी पहिल्यांदा कधी बनवली गेली? वैदिक-पौराणिक संबंध काय? जाणून घ्या कधीही न ऐकलेला इतिहास

Jalgaon News : सुरक्षितता हीच खरी दिवाळी! बाहेरगावी जाताय, सोने-रोख रक्कम लॉकरमध्ये ठेवा; पोलिसांनी सांगितल्या सुरक्षेच्या महत्त्वाच्या टिप्स

SCROLL FOR NEXT