navneet rana navneet rana
महाराष्ट्र बातम्या

‘बॅकफूटवर नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उड्डाणपुलावरच बसवणार’

सकाळ डिजिटल टीम

अमरावती : पुतळा प्रकरणावरून आम्ही बॅकफूटवर आलेलो नाही. येत्या १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीचे औचित्य साधून राजापेठ उड्डाणपुलावरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना केली जाईल, असे खासदार नवनीत राणा यांनी बुधवारी (ता. १६) सांगितले. राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीदिनी आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी अमरावतीमधील राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांच पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj statue) पुतळा बसवला होता. हा पुतळा महानगरपालिकने (Municipal Corporation) हटवला होता, हे विशेष...

राजापेठ येथील उड्डाणपुलावर विनापरवानगीने शिवाजी महाराजांचा बसवलेला पुतळा पोलिस बंदोबस्तात हटवण्यात आला होता. शिवाजी महाराजांचा पुतळा हटवू नये अशी मागणी युवा स्वाभिमान पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली होती. या पुतळ्यावरून राजकारण चांगलेच तापले होते. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या घरासमोर पोलिस आणि एसआरपीएफचा मोठा बंदोबस्तही लावला होता. त्यावेळीच १९ फेब्रुवारी रोजी नवनीत राणा यांनी राजापेठ येथील उड्डाणपुलावर पुतळा बसवू असे सांगितले होते.

१९ फेब्रुवारी रोजी शांततेच्या मार्गाने शिवजयंती साजरा केली जाणार आहे. वेळ पडल्यास गनिमीकाव्याने शिवछत्रपतींचा (Chhatrapati Shivaji Maharaj statue) पुतळा त्याच ठिकाणी बसविण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. पुतळा प्रकरणावरून आम्ही बॅकफूटवर आलो नसून प्रशासन व सत्ताधाऱ्यांच्या दबावात काम करपत असल्याचा आरोप नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केला.

योग्य वेळ येताच ते हजर होतील

आमदार रवी राणा हे पोलिसांना घाबरून दिल्ली येथे गेल्याची चर्चा निरर्थक आहे. ते मतदारसंघातील कामासाठी दिल्लीला ठाण मांडून आहेत. योग्य वेळ येताच ते हजर होतील, असे नवनीत राणा म्हणाल्या.

छत्रीतलावामध्ये भव्य शिवस्मारक

छत्रीतलावाच्या मधोमध शिवाजी महाराजांचा अश्वारूढ भव्य पुतळा बसविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. पुतळा बसविण्यासाठी आवश्यक परवानगी घेतली जात असल्याचेही नवनीत राणा (Navneet Rana) म्हणाल्या.

कुठलीही शहानिशा न करता गुन्हे दाखल

शाहीफेक प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दबावातच आमदार रवी राणा तसेच कार्यकर्त्यांच्या विरोधात पोलिस प्रशासनाने गुन्हे दाखल केले आहे. मनपा आयुक्तांच्या तक्रारीची कुठलीही शहानिशा न करता पोलिसांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले. या प्रकाराची संसदीय समिती, केंद्रीय अनुसूचित जाती आयोग तसेच मागासवर्गीय आयोगाकडे रितसर तक्रार करणार आहे. दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी करणार असल्याचे नवनीत राणा म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा आरोप खरा ठरला? मालेगाव बनावट कागदपत्र प्रकरणाचा तपास वेगवान

INDW vs AUSW : भारतीय संघाला धक्का! मधल्या फळीतील प्रमुख खेळाडूची मालिकेतून माघार; पुण्याच्या खेळाडूला मिळाली संधी

Mumbai News: जिथे कबुतरखाने तिथे चिकन-मटण सेंटर! ‘आम्ही गिरगावकर’ संस्था आक्रमक

PCMC Traffic : खड्ड्यांपासून चालकांची सुटका; मात्र कोंडीचा धसका, रक्षक चौकातील रस्त्याचे डांबरीकरण; सकाळी-रात्री वाहतूक संथगतीने

Navratri Fasting Tips: नवरात्रात उपवास करताय? मग या गोष्टीची काळजी नक्की घ्या

SCROLL FOR NEXT