Devendra-Fadnavis
Devendra-Fadnavis 
महाराष्ट्र

पुढचाही मुख्यमंत्री मीच - देवेंद्र फडणवीस

सकाळवृत्तसेवा

नागपूर - ‘विदर्भाच्या औद्योगिक विकासासाठी वीजदरात सवलत देण्यात आली आहे. पुढील मुख्यमंत्री आपणच राहाणार असल्याने ही सवलत आणखी पाच वर्षे कायम राहील,’ असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भातील उद्योजकांना दिले. येथे झालेल्या विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचा वर्धापन दिन कार्यक्रम आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले, ‘‘विदर्भ आणि मराठवाडा दोन्ही विभागांचा औद्योगिक अनुशेष भरून काढण्यासाठी औद्योगिक वीजदरात सवलत देण्यात आली आहे. ही सवलत २०१९पर्यंत आहे. मात्र पुढील निवडणुकीनंतर सवलतीचे काय होणार, असा प्रश्‍न उद्योजकांच्या मनात रुंजी घालत असेल. मात्र कोणाला घाबरण्याचे कारण नाही. विदर्भ आणि मराठवाड्यातील उद्योजक आपल्या पाठीशी असल्याने पुढचाही मुख्यमंत्री मीच राहाणार आहे. तुम्ही चिंता करू नका.’’

सरसंघचालकांची घेतली भेट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. मंत्रिमंडळाचा विस्तार, मराठा आरक्षण तसेच आगामी निवडणुकीची रणनीती या विषयावर उभयतांमध्ये चर्चा झाल्याचे कळते. राज्यात लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे.

मराठा आणि धनगर आरक्षण मुद्यावर भाजपच्या विरोधात रोष वाढत चालला आहे. घोषणा केल्यानंतरही मदत दिली जात नसल्याने सरकारवर शेतकरी नाराज आहेत. शिवसेना विरोधी पक्षात असल्यासारखीच वागत आहे. ओबीसी, मराठा, अनुसूचित जाती जमाती; तसेच सर्वसामान्य व शेतकऱ्यांच्या मनामध्ये असंतोष निर्माण करण्यासाठी विरोधक एकजूट झाले आहेत. काही वाचाळ नेत्यांमुळे पक्ष अडचणीत आला आहे. सर्व विरोधक एकत्र आल्यास आणि शिवसेनेने तटस्थ भूमिका घेतल्याने आगामी विधानसभेत भाजपला याचा फटका बसण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. याची दखल सरसंघचालकांनी घेतली आहे. हे बघता याच प्रमुख विषयांवर सरसंघचालकांनी चर्चा केल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT