Nana-Patole 
महाराष्ट्र बातम्या

मुख्य सचिवांनी सभागृहाची जाहीर माफी मागावी - नाना पटोले

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - सभागृहात औचित्याच्या मुद्याच्या मार्फत लोकप्रतिनिधी जनतेचे प्रश्न धसास लावण्याचा प्रयत्न करत असतात. त्यानंतर त्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची जबाबदारी प्रशासनाची असते. मात्र प्रशासन ढिम्म राहते. प्रशासनाच्या या उदासीनतेला पायबंद घातला पाहिजे आणि त्यामुळे म्हणून मुख्य सचिवांनी आत्ताच्या आता सभागृहात येऊन जाहीर माफी मागावी, असे आदेश मी अध्यक्ष या नात्याने या आसनावरून देतो, असे अध्यक्ष नाना पटोले यांनी घोषित केल्यावर क्षणभर सभागृह निःशब्द झाले. 

या प्रकाराचे गांभीर्य लक्षात आल्यावर सरकारच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आर्जव करीत अध्यक्षांना ही शिक्षा मागे घ्यायची विनंती केली. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही अध्यक्षांना विनवणी केल्यावर अध्यक्षांनी ही शिक्षा मागे घेतली. मात्र मी यापुढे असली कोणतीच गोष्ट खपवून घेणार नाही. जोपर्यंत मी अध्यक्ष आहे, तोपर्यंत या सदनातील कोणत्याच सदस्याचा अवमान सहन करणार नाही, असा सज्जड दम पटोले यांनी दिला आणि केलेले शिक्षा मागे घेतली.

राज्याचे कायदेमंडळ असलेल्या सभागृहाच्या सदस्यांकडून मतदारसंघातील अनेक प्रश्न औचित्याच्या मुद्याद्वारे उपस्थित करण्यात येतात. मात्र संबंधित विभागाकडून महिना उलटून गेला तरी त्यावर उत्तर दिले जात नसल्याने राज्याच्या मुख्य सचिवांनी विधानसभेच्या दरवाजात उभे राहून सभागृहाची माफी मागावी, असे आदेश पटोले यांनी दिले. याप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने मध्यस्थी करत मुख्य सचिवांना एकवेळ संधी द्यावी, अशी विनंती केली. 

विधानसभेत प्रश्नोत्तराचा तासानंतर कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. त्यानंतर पटोले यांनी राज्याच्या प्रशासनाकडून आमदारांनी उपस्थित केलेल्या औचित्याच्या मुद्यांना वेळेत उत्तरे दिली नसल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणली. नागपूर येथील अधिवेशनाच्या कालावधीत ८४ औचित्याचे मुद्यांच्या माध्यमातून विविध आमदारांनी मतदारसंघातील प्रश्न उपस्थित केले. या मुद्यांना एक महिन्याच्या आत उत्तरे देणे बंधनकारक आहे. तरीही अद्याप याची उत्तरे दिली नसल्याने पटोले यांचा पारा चढला होता. पटोलेंच्या भूमिकेचे सर्वपक्षीय सदस्यांनी बाके वाजवून स्वागत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PMC Election 2025 : पुण्यात मविआचं जागावाटप ठरलं, ठाकरेंच्या जागांमध्ये मनसेला वाटा; शरद पवारांच्या शिलेदारानं दिली माहिती

विरोध डावलून पोलिस बंदोबस्तात 12 हजार झाडांची कत्तल सुरू; पर्यावरणप्रेमी गप्पच, 8 हेक्टर क्षेत्रात सौर ऊर्जा प्रकल्पाचं काम!

IND vs NZ ODI Series: ऋतुराज गायकवाड IN; हार्दिक, जसप्रीत बुमराह OUT! भारताचा किवींविरुद्ध वन डे मालिकेसाठीचा संभाव्य संघ

Google Search : 2025 वर्षांत गुगलवर सर्च झाल्या 'या' 10 अत्यंत भयानक गोष्टी; धक्कादायक माहिती बाहेर आल्याने जग हादरलंय

CBSE KVS and NVS Recruitment 2025: सीबीएसईने केव्हीएस आणि एनव्हीएस भरती २०२५ टियर-१ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; 'असे' करा सिटी स्लिप आणि अ‍ॅडमिट कार्ड डाउनलोड

SCROLL FOR NEXT