2 ते 17 वर्षांच्या मुलांना कोवॅक्‍सिनचा डोस! जानेवारीपासून लसीकरण Sakal
महाराष्ट्र बातम्या

2 ते 17 वर्षांच्या मुलांना COVAXIN चा डोस! जानेवारीपासून लसीकरण

2 ते 17 वर्षांच्या मुलांना कोवॅक्‍सिनचा डोस! जानेवारीपासून लसीकरण

तात्या लांडगे

मार्च-एप्रिलमध्ये कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, या पार्श्‍वभूमीवर दोन ते 17 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचे नियोजन केले जात आहे.

सोलापूर : कोरोनाची (Covid-19) दुसरी लाट ओसरल्यानंतर नागरिकांमधील बेशिस्तपणा वाढला आहे. मार्च-एप्रिलमध्ये कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, या पार्श्‍वभूमीवर दोन ते 17 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचे (Covid-19 Vaccination) नियोजन केले जात आहे. त्यांना कोवॅक्‍सिन (Covaxin) व झायडस कॅडिला (Zydus Cadila) लस (Vaccine) टोचली जाणार असून, त्यासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे. परंतु, अजूनपर्यंत परवानगी मिळाली नसून साधारणपणे जानेवारीपासून या वयोगटातील मुलांना लस टोचली जाईल, अशी माहिती टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी दिली.

कोरोनामुक्‍त महाराष्ट्रासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून 18 वर्षांवरील सर्वांना प्रतिबंधित लस मोफत टोचली जात आहे. कोवॅक्‍सिन लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा तर कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतलेल्यांना 84 दिवसांनंतर दुसरा डोस टोचला जातो. लस घेतल्याचा सकारात्मक परिणाम समोर आला असून, त्यासाठी पुणे, सोलापूर, औरंगाबाद, नगर, नागपूर यासह अन्य जिल्ह्यांमध्ये सिरो सर्वेदेखील करण्यात आला. लस घेतलेल्या व न घेतलेल्यांमधील रोगप्रतिकारक शक्‍तीचा अंदाज घेण्यात आला. पॉझिटिव्ह तथा कोरोना मृतांमध्ये लसीचे दोन डोस घेतलेल्यांची संख्या खूपच कमी असल्याचे स्पष्ट झाले. या पार्श्‍वभूमीवर आता दोन ते 17 वयोगटातील मुला-मुलींनाही लस टोचण्याचे नियोजन केले जात असून, परवानगीसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. या वयोगटातील मुलांच्या नोंदीसाठी केंद्राला 'कोविन' ऍपमध्ये फेरबदल करावा लागणार आहे. त्याचे काम सुरू असून काही दिवसांत परवानगी मिळेल, असा विश्‍वास डॉ. ओक यांनी यावेळी व्यक्‍त केला. 2 ते 17 वयोगटातील मुलांना 28 दिवसांच्या फरकाने कोवॅक्‍सिनचे दोन डोस टोचले जातील. झायडस कॅडिला लसीचाही कालावधी तेवढाच राहणार आहे.

टास्क फोर्सचे निरीक्षण...

  • राज्यातील बहुतेक लोक कोरोना गेल्याच्या समजुतीतून प्रतिबंधित लस घेत नाहीत

  • बाजारपेठांमधील गर्दी वाढली असून त्या ठिकाणी कोरोनासंबंधीचे नियम पाळले जात नाहीत

  • गर्दीत जाणाऱ्यांकडे मास्क दिसत नाहीत; मास्क अन्‌ लसीकरणामुळे तयार होईल सामूहिक रोगप्रतिकारक शक्‍ती

  • मार्च-एप्रिलमध्ये कोरोनाची येऊ शकते तिसरी लाट; 2 ते 17 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाच्या परवानगीसाठी केंद्राकडे पाठपुरावा

  • नियमांचे पालन अन्‌ लसीकरणाची आवश्‍यकता

कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, त्यामुळे सर्वांना मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावेच लागेल. कोरोनावरील प्रतिबंधित लस सर्वांनी टोचून घ्यावी. दोन ते 17 वयोगटातील मुलांसाठी जानेवारीपासून लसीकरण सुरू होऊ शकते. त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे.

- डॉ. संजय ओक, अध्यक्ष, टास्क फोर्स, महाराष्ट्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PNG-LPG Rate: घरगुती गॅसच्या दरांत पुन्हा वाढ! सर्वसामान्यांना मोठा फटका; आता गॅससाठी किती पैसे मोजावे लागणार?

Chhatrapati Sambhajinagar: बनावट आधार कार्ड, परदेशात व्यवहार; केंद्रीय सुरक्षा यंत्रणेने वाळूजमधून युवकाला घेतले ताब्यात, नऊ तास चौकशी

Jalgaon: मामाच्या मुलीशी लग्न ठरलेलं, २५ वर्षीय तरुण अल्पवयीन प्रेयसीसोबत लॉजवर गेला, तिथंच आयुष्य संपवलं; तरुणीसह लॉजचालक ताब्यात

Latest Marathi Update Live: पंढरपूर कुर्डुवाडीत कुस्त्यांची दंगल

रेड एफएम मराठी फिल्म फेस्टिव्हल सीझन ६ चा भव्य आणि दिमाखदार समारोप

SCROLL FOR NEXT