Chitra Wagh And Sanjay Raut  esakal
महाराष्ट्र बातम्या

चोरीचा मामला सेना भवनातच बोंबला, चित्रा वाघ यांची संजय राऊतांवर टीका

'चोरीचा मामला सेना भवनातच बोंबला.'

सकाळ डिजिटल टीम

पुणे : भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्युरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. महाराष्ट्रात भारनियमन सुरु आहे. त्यास कोळसा टंचाई कारणीभूत आहे. त्यामुळे वीज निर्मितीवर परिणाम झाला आहे. मात्र आता वीजेवरुन राजकीय नाट्य सुरु झाल्याचे दिसत आहे. नागपूर येथे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची सभा पार पडली. या सभेसाठी चोरीची वीज वापरण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. यावर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी टीका केली आहे. त्या म्हणतात, गुरुवारी नागपुरात शिवसेनेच्या सर्वज्ञानींची भरलेली सभा चोरीच्या विजेतून झाल्याचं समोर आलं आहे. (Chitra Wagh Attack On Sanjay Raut Over Power Theft)

आता पक्षांतर्गत चौकशीची सारवासारव केली जात आहे. चोरीचा मामला सेना भवनातच बोंबला, अशी घणाघाती टीका वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे. राऊत यांची गुरुवारी (ता.२१) नागपूर येथी गजाजन परिसरात सभा पार पडली. या प्रसंगी ते म्हणाले, नागपूर महापालिकेत घोटाळा करणारे तुरुंगात जातील.

दरम्यान सभेसाठी वीजेच्या तारेवर आकडे टाकून वीज चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र असा कोणाताही प्रकार घडला नसल्याचे सांगण्यात आले आहे. सभेच्या ठिकाणामागे असलेल्या गजानन महाराज यांचे मंदिर होते. तेथून परवानगीने आम्ही वीजपुरवठा घेतला, असे स्पष्टीकरण आयोजकांनी दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT